दीपक परुळेकर-फोन भूत !!!!--क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:44:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दीपक परुळेकर"
                                  ----------------- 

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री "दीपक परुळेकर" यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "फोन भूत !!!!"

                                   फोन भूत !!!!--क्रमांक-3--
                                  -----------------------

     मी अशी शंका बोलुन दाखवल्यावर सगळे सिरिअस झाले... फोन आल्यावर मी तो स्पीकरवर ठेवायचो जेणे करुन त्यांनाही ऐकायला जावं..पण काहीच ऐकु येत नव्हतं.. पण ,मला बाकिच्यानी वेड्यात जमा केलं.नंतर मला ह्या साल्यांचा डाउट यायला लागला, कदाचित यांच्यापैकीच कुणीतरी प्रँक करत असेल.. मी त्यांआ शिव्या घालायला सुरुवात केली, बोललो साल्यांनो तुम्हीच हे कॉल करताय्.सगळ्यांनी आपापले सेल फोन काढुन समोर ठेवले..५ मि.परत फोन आला..आता काय बोलणार??? मी फोन उचलला, काही बोलायला जानार इतक्यात काय झालं, अमेय काही तरी बोलला आणि ते चक्क मला माझ्या फोनमध्ये ऐकु आलं. मी घाबरलो..घाबरुन बोललो, " हे काय? चाललयं?? आपण जे ह्या रुममध्ये बोलतोय ते मला माझ्या फोनमध्ये ऐकु येतेयं, डॅम्न!!! " " बघु, बघु" म्हणुन कुणीतरी फोन घेतला इतक्यात तो डिसकनेक्ट झाला... हे काय चाललयं, मला काहिच समजत नव्हतो.. माझ्या काहिच लक्षात येत नव्हतं. बाकिचेही माझ्याकडे घाबरल्यासारखे बघत होते...अ‍ॅलकोहोलचा परिणाम असेल माझं डोकं सुन्न झालं होतं. त्या सारख्या सारख्या फोन कॉल्सच्या टॉरचर्समुळे मी वेडा झालो होतो... अतिशय घाबरलो होतो. लिकर संपलं होतं. पण फोन कॉल्स संपले नव्हते...सगळेजण मला रिलॅक्स व्हायला सांगत होते.मला काय करावे ते सुचत नव्हते... इतक्यात परत फोन वाजला.. मी अ‍ॅन्सर केला..भयाण शांतता...." हॅलो ?......."

     पलिकडुन काहि तरी कुजबुजण्याचे आवाज... श्वासोच्छवासांचा आवाज....मी चापापलो...
पलिकडुन व्हिस्परिंग आवाज आला, " हॅ......लो....."
मी ओरडलो, "ए कुणीतरी बोलतय..." " हॅलो... कोण आहे?? " मी भीत भीत विचारले....
"दी....प.....कक्क्क..???." व्हिस्परिंग साउंड....
" या अ‍ॅम दिपक.... व्हु इज धिस??" ( मला स्केरी मुव्ही आठवला.)..
" दी...पकक्क्क...., यु...आ...र डे....ड नाव...! अ‍ॅम कमिंग....
." कोण आहे ? *#*** !!! ,,, #* @***, फ*%^@***!!!!, हिम्म्त असेल तर समोर ये...!! " मी त्वेषात तोंडाला येईल ते बोलत होतो...
" कोण आहे रे ? काय झालं ? " ' माहित नाही रे कोण आहे साला,बॅस्टर्ड मला बोलतोय यु आर डेड नाव !!!"
" आवाज कुणाचा आहे? ''
" काय माहित ?? इट्स व्हिस्परिंग !!! "
सगळेजण गपगार झाले.. काय चाललयं कुणालाच काही कळत नव्हतं... माझी तर सगळी उतरली... मी घामाघुम झालो होतो... कोण असेल?? मला काहिच कळत नव्हतं... ( ४ पेग डाउन झल्यावर काय माती कळणार ???)

     माझे सगळे तर्क वाया जात होते... बरं हे सगळं संध्याकाळपासुन सुरु झालं होतं आणि आता तर रात्रीचे २ वाजायला आले होते.... ती इतक्या रात्रभर जगुन फोन का करेल??? बरं तीने इतक्या वेळा फोन केला, एकदा तरी ई बोलली असती ना!! आणि ती यु आर डेड ! असं कशाला म्हणेल??? शी* मॅन ! डोकंच चालत नव्हतं... मी सेल स्विच्ड ऑफ केला... आणि बसुन राहिलो....बाकिचे झोपायच्या तयारीला लागले...पण माझी झोप तर केव्हाच उडाली होती...सगळ्यांनी मला धीर दिला .. आणि झोपायला सांगितले... पण मी पुरता घाबरुन गेलो होतो.. तेजसने मला पाणी आणुन दिले.. मी सगळ्यांकडे बघत होतो आणि ते माझ्याकडे विचित्र नजरेन बघत होते..होत असलेल्या प्रकाराला काय म्हणावं तेच कळत नव्हतं !! भुताटकी??? आत्मा??? डॅम्न!! ( मी ह्या बाबतीत डरपोक आहे ) नंतर ह्या विषयावर आमच डिसकशन सुरु झालं.. कोण - कोण कसले कसले, कुठुन कुठुन ऐकलेले भुता - खेतांचे किस्से सांगत होते आणि मे अजुन घाबरत होतो... इतक्यात तेजसने मला खिडकीपाशी बोललवलं अनी सांगितलं की समोरच्या बिल्डिंगमधला तो फ्लॅट आहे ना तिथुन एका मुलीने उडी घेउन आत्महत्या केली होती....आणि तो किस्स सांगितला... देव आणि अमेयने तेच सांगितले... नंतर मी बिछान्यावर पहुडलो पण मला झोप येत नव्हती. ती खिडकी आणि बाहेरचा भयाण अंधार मला डिस्टर्ब करत होता... मी तेजसला ओरडलो
"पहिल्यांदा ती खिडकी बंद कर साल्या, तिथे कुणे तरी आहे... !!!"
" अरे कुणी नाही तिथे !! झोप गपचुप ! "
" नाही, नाही ! मला कुणीतरी दिसतयं तिथे !!! बंद कर आधी !!' मी ओरडु लागलो...आणि परत उठुन बसलो...
आणि एक भयंकर डायलॉग मारला, मला माहित नाही हा डायलॉग मला कसा आठवला किंवा कसा सुचला !!

--दीपक परुळेकर 
(SUNDAY, NOVEMBER 1, 2009)
-----------------------------------

               (साभार आणि सौजन्य-दीपक परुळेकर.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
              -------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.