ती रात्र

Started by शिवाजी सांगळे, September 15, 2022, 12:41:45 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ती रात्र

रात्र ती कविता आहे मनात घोळते आहे
विचारांच्या सांगाती स्वप्नात खेळते आहे

प्रकाशामधे मंद, शितल शुभ्र या चंद्राच्या
चांदण्यांचीही हळूहळू मैफल सजते आहे

पाहूनी गिरी रांगा शांत निरव पहुडलेल्या
वाऱ्यासोबत गीत अंगाईचे रात्र गाते आहे

पाहूनी तुटता एक तारा खाली धरे वरती
कुणीतरी इथे मनी इच्छा एक धरते आहे

खेळत आहे, स्वप्नात विचारांच्या सोबती
ती रात्र कविता एक, मनात घोळते आहे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९