माझ्या डायरीतली काही पानं .............

Started by tinaa, July 25, 2010, 12:36:32 AM

Previous topic - Next topic

tinaa


           
                भावनांचं वर्गीकरण कस कराव हे मला अजूनही समजत नाही . या क्षणाला माझ्या भाव-विश्वात माझे किती मित्रमैत्रिणी कुठल्या जागी आहेत हे सांगण माझ्यासाठी जरा अवघडच आहे पण त्यांच्यासोबत अनुभवलेला प्रत्येक क्षण ...मग तो चांगला म्हणा कि वाईट... एका शिदोरीत बांधल्यागत आहे..its just a TREASURE...A big big Treasure....
                भलत्याच वेळी भलतच काही आठवून घडत असलेल्या गोष्टींशी त्यांची समीकरण जोडायची कुणा अर्थी 'चांगली' तर कुणा अर्थी 'वाईट' सवय आहे मला ! अजूनही ती रात्र आठवली कि मन अगदी भरून येत... 'जगी सर्व सुखी असा कोण आहे... 'म्हटलं तर मीच आहे...मीच आहे..
               ती रात्र होती २४ डिसेंबर २००९ ची ... जेव्हा तिला भेटायच्या ओढीने आम्ही दोघेही अमरावतीला निघालो होतो ... काय दिवस होता तो...सगळ कस एकदम  perfect... बावळट प्रमाणे लोकांना चुकवीत शेगाव पासून अकोल्यापर्यंत अक्षरशः ताटकळत उभ राहिलो ; हे गाडीचे धक्के आणि सर्व सहन केल... सुदैवाने त्या नंतरची गाडी एकदम मस्त मिळाली...समोरच्या सीट वरील काका-काकू , तो टकला, बाजुच आपल्याच नादात असलेल ते जोडप .. त्यावर माझी वटवट (....?....मी छान आहे मूळी...हे आपल उगाचच..)....lights off...थंडगार हवा....शांत वातावरण...पण एवढ्या सगळ्या मध्ये दोघांना फक्त तिथ पोहचायची घाई झालेली ... 
             त्या दिवशी मी स्वतःवरच जाम खुश होते ... काय करू नि काय नको अस झाल होत .. त्यात या मुर्खाला सांगितलं सुद्धा नव्हत कि आज तो दुसऱ्या कुणाकडे शहीद होणार नव्हता ... प्रत्येकजण ...अगदी तिघेही आपापले मनोरे रचत होते...काही कल्पना नाही ती काय फिलिंग होती कि अजून काही ...प्रेमा एवढी सुंदर भावना कुठलीच नाही अस म्हटल्या जात ... तर मग ह्याला काय म्हणावं ... इतकी ओढ एखाद्या व्यक्ती बद्दल कि त्या समोर काही सुचूच नये... after all she is not my lover or not of him also...मित्र आहोत आम्ही एकमेकांचे ..मी तर ...आता परत परत तेच काय ... Even  या क्षणी पण मी तेवढीच  excite आहे जेव्हा मी तिला एवढ्या दिवसांनी भेटणार आणि माझ्या आवडीच्या दोन व्यक्तींसोबत काही दिवस घालवणार या विचारांनी होते... (I hope ते पण असतील त्यावेळी...मरू दे...माझ काय जात ? पण आपण बुवा SOLID खुश होतो तेव्हा..).
           ऑटोतून उतरल्या उतरल्या आम्ही तिच्या रूमच्या दरवाजाकडे बघितलं...White T-Shirt  आणि Black कलर ची कॅप्री हि तिची छबी बघून पाय तिथेच थबकले ...बास ... वाटल हा क्षण हातून सुटूच नये ..जागच्या जागी आम्ही सारे स्तब्ध . ना तिला काही सुचत होत नाही मला..मग त्याच्याबद्दल बोलण्यात तर वादच नै...काय तो moment अवर्णनीय होता...it  was just ossum ...तिची ती नजर..त्यातल ते प्रेम .. तो आनंद..थबकलेले पाय ..ओठांवर रुतलेले शब्द __ मी कुणी साहित्यिक होण्याच्या अजिबात विचारात नै ; पण within a fraction of second आम्हा तिघांनी जे काही अनुभवलं that was amazing ... देवाने मन पण काय घडवली नै ...ना तिच्याजवळ ते सांगण्यासाठी शब्द होते .. ना त्याच्याजवळ ...आणि मी.....
           रात्र कसली मध्य-रात्र होती ती ..आल्या प्रवासाच्या गप्पा मारत मजेत अगदी गाढ झोपी गेलो तिघंही...एकच गादी...एक blanket ...एक चादर आणि वरून बोचणारी ती डिसेंबर ची थंडी..पण त्या थंडीतही आपण सोबत आहो हि भावना  इतकी उबदार होती कि काही जाणवलच नाही ...मला माहित नाही सगळी पोर चांगली असतात कि वाईट...कामापुरती गोड गोड बोलणारी आणि नंतर .... असो...एखादा मुलगा आपल्या मैत्रिणीसोबत कसा असतो , आपल्या प्रेयसीसोबत कसा असतो किवा आपल्या बायकोसोबत कसा असतो..यातल्या कुणा एकीशी तो किती प्रामाणिक असतो हे त्याच त्याला ठाव ...मुळातच कुठल्याही relation  विषयी इतक विचार करण्याची हि पहिलीच वेळ .. ना कधी मुलांशी एवढ बोलायची , share करायची वेळ आली ... ना हि हातचा जिवलग सखा होता ... पण हा माझा मित्र मात्र माहोल आहे बर का....
          त्या पूर्ण राहण्यात "ती" आमची hosting आणि hospitality अगदी मन लावून करत होती..त्या दोघांचही डोक मांडीवर घेऊन मी केसांमधून हात फिरवीत असताना न राहवून ती त्याला म्हणाली.."ए,sorry यार ... पण मी तुझ्या राहण्याची व्यवस्था नाही करू शकले ... तुला वाईट तर वाटत नै आहे न ? "...आणि तो म्हणाला.."मला तर अस वाटत आहे कि मी स्वर्गात आहो..वाटत हे सगळ इथेच थांबून जाव आणि रात्र कधी संपूच नये.." या वरून ज्याला जो विचार करायचा तो त्यांनी करावा पण रात्री २.३०-३ च्या दरम्यान माझा डोळा उघडला जेव्हा आम्ही दोघी गाढ झोपेत होतो आणि हे महाशय आपल्याच खुशीत एकटक पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्या मैत्रिणींकडे डोळे भरून बघत होते.....___.....याला आणिक ए काय म्हणावं....तिने त्याच रात्री आम्हाला बघितल्या नंतरची तिची नजर आणि आपल्या मैत्रिणी ज्या त्याच्या लेखी त्याचे चांगले मित्र.....यांच्यासोबत आपण आहोत ..एकत्र आहोत या सुखाने हरखून गेलेल्या...न जाणो हे सगळ स्वप्नवत आहे आणि आपण डोळे मिटले तर त्या तिथ नसतील म्हणून स्वतःच्या प्राणप्रिय झोपेला डोळ्यातच अडवून त्या त्याच्या मैत्रिणींसोबत असल्याच सुख नजरेनेच पिणारा तो माझा मित्र....या दोघांची नजर नामानिराळीच....
          माझ्या येथील college मधील बरेच क्षण हे मला न विसरण्याजोगे आहेत ... पण या सर्वांमध्ये ती रात्र , ते सोबत घालवलेले दिवस आणि त्यातही त्या दोघांची नजर ... ते स्मितहास्य ...ते प्रेम ... मी उभ्या जन्मात कधीच विसरू शकणार नाही ... and thanks to both of them कि इतका सुंदर अनुभव आणि आठवण त्यांनी मला दिली ... and I tell you they are  too good that anyone could be in Love with them....I love my friends.... 


rudra


gaurig