कविता पावसाच्या-कविता-सत्तावन्नावी-मुंबईचा पाऊस

Started by Atul Kaviraje, September 16, 2022, 10:33:31 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "कविता पावसाच्या"
                                    कविता-सत्तावन्नावी   
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा पाऊस यावर्षी अगदी सुरुवातीलाच मनसोक्त बरसला आणि या पावसाला साजेशा कविताही कविमनातून उत्स्फूर्तपणे प्रगटल्या. प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा पाऊस यावर्षी अगदी सुरुवातीलाच मनसोक्त बरसला आणि या पावसाला साजेशा कविताही कविमनातून उत्स्फूर्तपणे प्रगटल्या. महाराष्ट्राला सुखावणा-या या पावसावर दै. 'प्रहार'ने 'बालकवी' पुरस्कारासाठी कवींना 'पाऊस' या विषयावर कविता पाठवण्याची एक अनोखी संधी दिली आहे. पावसावरील अशाच काही निवडक कविता आम्ही आपणा वाचकांसाठी क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

                                     "मुंबईचा पाऊस"
                                    ----------------

गरिबांच्या बसवर, ट्रेनवर बरसतो
श्रीमंतांच्या विमानालाही भिजवतो
रस्त्यावर साचुनी तळे बनवतो
गगनचुंबी इमारतींच्या छतातुनी झिरपतो
चाळींच्या पत्र्यातुनी 'टपात' टपकतो
दप्तरातील वह्या-पुस्तके भिजवतो
'छत्रीला' अचानक हवेत फिरवतो
छत्री संगे असता 'दांडी' मारतो
छत्री घरी विसरता, जोराने बरसतो
समुद्रकिनारी लाटा होऊनी फेसाळतो
मुंबईवर मुसळधार कोसळतो
मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवतो
कसाही असला पाऊस, मनाला भिजवतो
कसाही पडला पाऊस, सर्वानाच आवडतो.
उकाडय़ाने हैराण झालेला मुंबईकर
पावसाने सुखावतो, पावसाने सुखावतो
कारण तो कधी येईल याचीच वाट पाहतो
तो आल्यावर घामापासून सुटका होते
तो पडल्यावरच वर्षभराचे पाणी मिळते.

--युवराज माडेकर, विक्रोळी
------------------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-प्रहार.इन)
                         -----------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2022-शुक्रवार.