आकाचे लेख-वृदधाश्रमातल्या काही वल्ली

Started by Atul Kaviraje, September 17, 2022, 10:04:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "आकाचे लेख"
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "आकाचे लेख" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "वृदधाश्रमातल्या काही वल्ली"

                              वृदधाश्रमातल्या काही वल्ली--
                             ------------------------

     मेच्या महिण्यामध्ये तळोजाच्या एका वृद्धाश्रमाला भेट देण्याचा योग आला.
पुरुषांच्या एका खोलीत आम्ही शिरलो. खोलीतल्या नजरा आमच्याकडे वळल्या. काय भाव होते त्यांच्या चेह-यावर हे चेह-यावरील सुरकुत्यांमुळे कळुन येत नव्हते. आम्ही त्यांना नमस्कार करून त्यांची विचारपुस करू लागलो. दरवाजा समोरील एका बेडवर एक गृहस्थ होते.

     नाव जोशी. गोरा वर्ण, हाफ खाकी पॅंट, डोळ्यावर जाड भिंगाचा चश्मा. अस्सलखित मराठीत त्यांच बोलणं सुरु. अस्सल भटुरडे म्हणावं असं व्यक्तिमत्व. त्यांनी आवर्जुन फोटो काढायला सांगितला आणि त्याची एक प्रत मिळावी अशी त्यांची ईच्छा होती. खुप मजा आली त्यांच्याशी बोलताना.

     खोलीभर नजर फिरवताना कोप-यातले एक आजोबा मला बोलवताना मी पाहीलं. त्यांच्याकडे गेलो आणि तबियत कशी आहे याची विचारपुस केली. त्यांच नाव मगनभाइ.
"एक फोन लगाके दोगे?"
मी खिश्यातून फोन काढला. त्यांनी लगेच नंबर सांगितला. फोन लावून त्यांना दिला. त्यांच संभाषण गुजराथी मध्ये सुरु होतं. समोरच्याची खुशाली विचारत होते ईतकं कळलं. संभाषण संपलं.
"मेरे शेटको फोन लगाया था. उसका बेटा था फोनपर. उसका लडका अब बडा हो गया है."
"आपके घर फोन करना है"
"मेरा घर नही है. जबसे बंबई आया हूं तबसे शेटने मेरे हो संभाला. बुढा हो गया तो मेरा खयाल रखने के लिए मेरे को यहा भेजा. मेरा शेट बहुत भला आदमी था. उसके परीवारकोही मैं अपना परीवार मानता हू"

     मनाला लागणारं हे असं एक व्यक्तीमत्व.
मी मगनभाईशी बोलत असताना बाकीच्यांनी एका आजोबांना गराडा घातला होता. नाव रंगनाथ शेळके.

(Thursday, August 11, 2011)
--------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-आकाचे लेख.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2022-शनिवार.