माझं विश्व …माझ्या शब्दात !!-महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती--क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:31:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "माझं विश्व ...माझ्या शब्दात !!"
                               ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "माझं विश्व ...माझ्या शब्दात !!" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती"

                 महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती--क्रमांक-4--
                ------------------------------------------

     अशा तऱ्हेने ५ जोड्या मिळाल्या.  मग त्यांच्या धमाल फ़ेऱ्या........ खूप मज्जा आली.  असेच "जोडी तुझी माझी' ही मुलांची स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा ही bachelors ची स्पर्धाही चांगल्याच दणाणल्या. शेवटी जबरदस्त दांडीया. अगदी लक्षात राहील सगळ्याच्या असा झाला हा सोहळा.

     ह्यावर्षी भारतातून मराठी नाटक "सासू नंबर वन" हे तुफ़ान विनोदी नाटक इथे आणण्यात आम्ही यशस्वी झालो.  नयनतारा, आशा साठे आणि नंदू गाडगीळ ह्या त्रयीनी मनमुराद हसवलं सगळ्यांना. पुढचे दोन दिवस ह्या कलाकारांचा आम्हा सगळ्याना सुरेख सहवास लाभला.

     आता होता संपूर्ण वर्षाचा कळसाध्याय, आमचं वार्षिक स्नेहसंमेलन.  अगदी कळस शोभावा असाच झाला हा कार्यक्रम.  पुर्वार्धात सगळ्या कलाकारांचे विविध कार्यक्रम आणि उत्तरार्धात स्थानिक कलाकारांचं नाटक असा पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम होता.  कधीही न झालेला फ़ॅशन शो आणि "पाऊस" हा Audio-Visual कार्यक्रम विशेष आकर्षण होतं.  "पाऊस " हा आमचा जिव्हाळ्याचा विषय.  मी आणि विवेकनी तयार केलेला हा आगळावेगळा प्रोग्रॅम सगळ्यांना मनापासून आवडला.  निवेदन लिहिलं होतं मी आणि निवेदक होतो मी आणि विवेक.

     काव्यात्मक निवेदन, गाणी, नृत्य अशा विविधतेनी नटलेल्या कार्यक्रमातून सगळ्या प्रेक्षकांना चिंब भिजवलं.  सोबत स्क्रीनवर पावसाच्या कार्यक्रमाला साजेशा slides पण दाखवत होतो.  सगळ्या लोकांना भावलेला वेगवेगळा पाऊस, त्याची निरनिराळी रुपं, विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट...... अगदी सगळं सगळं अनुभवलं प्रेक्षकांनी.  The show was just SUPERB!  खूप खूप समाधान मिळालं.  ह्यात कितीतरी सभासदांची अख्खी कुटूंबं गुंतली होती.  जवळपास ५० च्या वर लोंकांनी ह्यात भाग घेतला होता.

     हा सुद्धा आयुष्यातला एक खूप आनंदी दिवस !

     उत्तरार्ध पण खूपच रंगला.  अल्काताईंनी अगदी प्रोफ़ेशनल नाटकासारखा सेट बनवला होता.  अनिलभाऊ केतकर, प्रसन्न देवस्थळी, स्वाती मराठे, सुरेश मराठे, मीलन शहा, रमेश गाडगीळ, राधिका साडेकर ह्या मंडळींनी नुसती धमाल उडवली.

     तर ही आमच्या महाराष्ट्र मंडळाची कहाणी साठाउत्तरी सुफ़ळ संपूर्ण 🙂

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(कुवेत, ऑगस्ट 23, 2006)
-------------------------

                  (साभार आणि सौजन्य-आशा ब्लॉग.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.