पालवी-स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य--क्रमांक-4-ब

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:49:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "पालवी"
                                       ---------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी यांच्या "पालवी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य"

                            स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य--क्रमांक-4--
                           -------------------------------

     शेवटी एवढेच सांगावेसे वाटते , की झेपावणा-या पंखांना क्षितीजे नसतात,त्यांना फ़क्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते. प्रबळ इच्छा शक्ती असणा-या स्त्रीला 'अशक्य' हा शब्द माहित नसतो.परंतु आपले " ईप्सित '' साधण्यासाठी तिला योग्य मार्गाने जावे लागते. तरच तिचे सर्व प्रयत्न सफ़ल होतील.पाखराला दाणे हवे असतील तर आकाशाला गवसणी घालावी लागते. अर्थात प्रत्येक स्त्रीने सर्व शक्तीनिशी प्रयत्न केला तर तिला अपेक्षित ध्येय,यश नक्कीच प्राप्त होईल. प्रत्येक स्त्रीने कुटुंबाची कर्तव्ये पार पाडत , जेष्ठांना योग्य सन्मान देत ,त्यांच्या सहकार्याने किंवा प्रसंगी प्रत्येकीने स्वत:चा उद्धार स्वत:च करावा!

     अशावेळी स्त्रीने आपल्याला हवे तसे स्वातंत्र्य मिळवताना स्वत: बरोबर इतरांना देखिल कमी लेखू नये, धिक्कारु नये,किंवा अवमानू नये......अपमानित तथा अध:पतित ही करु नये. भारतीय स्त्रियां विचारक्षम व्हायला हव्यात. नैतिकबल व आत्मबल हे अधिक महत्वाचे आहे. आचरण पवित्र असले पाहिजे. तसेच प्रत्येक स्त्रीला पती खेरीज पुरुष पुत्रासमान वाटले पाहिजेत. आणि प्रत्येक पुरुषाला देखिल धर्म पत्नी सोडून बाकी सर्व स्त्रीया मातेसमान वाटल्या पाहिजेत. हिंदुस्थान आणि हिंदु धर्म यांविषयी श्रद्धा बाळगायला हवी. जगाकडून आजच्या स्त्रीला अवश्यमेव काही थोडे घ्यायचे आहे, पण त्यापेक्षा अधिक अनंत पटीने द्यायचे आहे.त्यासाठी सर्व स्त्रियांनी समर्थ व्हावयास हवे. आपल्या मनातील गैर भ्रम झाडून टाकून मिळणा-या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करा. त्या साठी "उठा, जागे व्हा, हीच योग्य वेळ  आहे.......

     "उत्तिष्ठ, जाग्रत , प्राप्य वरान्निबोधत !"

--सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी
जयसिंगपूर.
(July 7, 2010)
--------------------------

                      (साभार आणि सौजन्य-पालवी.वर्डप्रेस.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                     ---------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.