मनाचे-तरंग-कोरिगड (Korigadh)--क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 19, 2022, 10:56:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "मनाचे-तरंग"
                                    -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री दर्शन यांच्या "मनाचे-तरंग" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "कोरिगड (Korigadh)"

                          कोरिगड (Korigadh)--क्रमांक-4--
                         -------------------------------

     पोटपूजा झाल्यावर आणि आणखी फ्रेश झाल्यावर आमची दुसऱ्या phase ची पदभ्रमंती सुरू झाली.  हलका पाऊस अंगावर झेलत आम्ही तटाला प्रदक्षिणा घातली, अगदी अजूनही भक्कम असलेला, चांगला दीड पुरुष रुंदीचा हा तट म्हणजे ह्या गडाचे अभेदयतेचे लक्षण. इंग्रजाना खूप झुंज देवूनही हाती पडला नव्हता. शेवटी एक तोफ गोळा दारूच्या कोठारावर पडला आणि किल्ल्याचा भाग्य फिरलं. किल्ला फिरंग्यांच्या हाती लागला.

     मधेच धुकं बाजूला सरला कि खाली उतरणारा कडा आणि ओसंडून वहणारे धबधबे दिसत होते. फारच कमी वेळात ते कॅमेरयात बंद करताना चांगलीच भंबेरी उडाली. किल्ल्यावर अजून एक तोफ देखील शाबूत आहे आणि आश्चर्य म्हणजे खूपच चांगल्या स्थितीत आहे.

     मन भरून किल्ला फिरल्यानंतर आणि, धुक्याच्या दुलईत दिवस घालवल्यावर, परतीची वेळ आली. प्रसन्न झालेले आणि पावसाच्या गार पाण्याने आनंदित झालेले आम्ही किल्ल्याचा निरोप घेवून परतीच्या प्रवासाला लागलो. पावसाचे मन मात्र पूर्ण भरलेले न्हव्हते. त्याला आम्हाला चिंब करायचेच  होते. नंतर सुरू झालेल्या जोरदार सरींनी पूर्ण चिंब करून टाकले.

     श्रावण सरींनी पूर्ण न्हावून निघालेले सगळे ट्रेकर्स , raincoats आणि rain cheaters बाजूला सारून फक्त भिजण्याचा आनंद लुटत होते. पावसाचा धबधबा असा अभाळातूनच पडू लागल्यावर, बुशी डँमला जायची गरजच काय हो.  ऐकूण भलतीच धमाल आली.

     लवकर निघूनही बुशी डँमच traffic काही चुकल नाही.  मुंबई पुण्याची, बुशी डँम  फँन मंडळी गाड्या बसेस नि  तिथे सांडली होती.  १०-२० रुपयांचे changing room चे notice boards  वाचून मजा वाटत होती.

     खंडाळ्याला थोडा नाश्ता केल्यावर लक्ष गेला ते egg sunday च्या window कडे. egg कटोरी, egg sandwitches, scambled egg, mushroom  cheese  omlete, egg biryani  असे काही आधी ऐकलेले आणि काही नवीन प्रकार पाहत होतो. अर्थात बारीक शरीर यष्टी असली तरी खायच्या बाबतीत नवीन गोष्टींचा आस्वाद घ्यायला मला खूप आवडते. तसा मी एग्ग भुर्जी चा फँन. लक्षात आल कि वडापाव बरोबर बरीचशी मुंबई ह्या अंड्यांवर देखील अवलंबून आहे.  रस्त्याच्या कडेला मांडलेल्या boiled eggs आणि भुर्जी omlete, पाव च्या टपरया भरभरून गिऱ्हाईक खेचतात.

     होस्टेलच्या वास्तवात वडाळ्याला परीक्षेच्या काळात आम्ही जे रात्री ३ वाजताही भुर्जी पाव खायला जायचो त्याची आठवण जागी झाली. मामाच्या उंबरगोठणच्या हॉटेल बाहेरील झणझणीत हिरव्या  मिरच्या घातलेला omlete पाव, नंतर मागाहून समजलेला, अंड्यात बुडवून shallow fry केलेला french bread,  वाह क्या बात है !!  आठवणीनेही मजा आली. श्रावणाच्या sunday ला egg sunday च्या receipes discuss केल्यावर आणि घरी गेल्यावर try  करण्याचे promise घेतल्यावर, आमची खवैय्यांची गाडी मग आजूबाजूच्या निसर्गावर, खंडाळ्याच्या bunglows  वर आणि ट्रेक मध्ये केलेल्या माजेवर वळली

     एकूण बऱ्याच काळाने केलेला, भरपूर पावसाची मजा असलेला, हिरवाईने नटलेला आणि खूपश्या जुन्या नवीन मित्र मंडळींनी लक्षात राहील असा हा कोरीगढ चा ट्रेक. facebook वर फोटो uploaded आहेत. पण येथे थोडे टाकतोच आहे. जरूर जा आणि खूप मजा करा.

--दर्शन 
(Saturday, 27 October 2012)
--------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-मनाचे-तरंग.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.