दैनंदिनी-दैनंदिनी – ३० जुलै २००९--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 19, 2022, 11:09:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "दैनंदिनी"
                                      ----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री निलेश सकपाळ यांच्या "दैनंदिनी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दैनंदिनी – ३० जुलै २००९"

                          दैनंदिनी – ३० जुलै २००९--क्रमांक-१--
                         --------------------------------     

     साचेबद्धता, पठडीबंद जगणे, एकाच रस्त्यावरून वर्षानुवर्षे प्रवास करणे, एकाच घरात, एकाच ठिकाणी पिढ्यानपिढ्या राहणे चुक आहे का? वेगाचे बंधन नसलेल्या आपल्या पिढीला हे विचार बुरसटलेले अन टुकार वाटतात.. वेडगळ वाटतात.. का?? मग आपले आई-वडील, आजी-आजोबा चूक होते का? आधीच्या पिढ्यांनी जे काही केले ते सगळे कालबाह्य झाले का?

     नक्कीच आता महत्वIकांक्षेची क्षितीजं विस्तारली आहेत.. आता दहा बाय दहाच्या वाड्यातून साता समुद्रापलिकडील पहाट सहज दिसते, अनुभवता येते किंवा ती साद घालते... अन का करु नये? मुलभूत शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात का जाऊ नये.. गेलेच पाहीजे तिथे सगळ्या सोयीसुविधा आहेत, आमच्या प्रतिभेचा योग्य सन्मान केला जातो अन ती तशीच जोपासलीही जाते, सामाजिक आयुष्य सुरक्षित आहे, बिनधोकपणे कुठे कधीही अन केव्हाही वावरता येते, जगातील सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो अन तेही सहज, विनासायास. आमची सर्वांगीण प्रगती होत राहते, जगातील सर्व उच्चशिक्षितांबरोबर स्पर्धा करता येते, आपली उपयुक्तता सिद्ध करता येते, ठरलेल्या वेळेत कामे होतात, ठरलेल्या वेळात घर गाठता येते, रोज घरच्यांशी ऑनलाईन बोलता येते, आता तर आम्ही एकमेकांना अगदी घरात बसल्यासारखे बघुन बोलू शकतो त्यामुळे घरातील हळव्या लोकांनाही आता काही अडचण नाही, बरेचशे मित्रसुद्धा कितीतरी वेळेला सहज फिरताना इथे सापडतात, इथे सगळ्यांची वेव्हलेंग्थ मॅच होते, येथील वादविवादसुद्धा एकदम शिस्तीत असतात, कुठेही मारामारी किंवा खुन्नस नाही.. सगळे आटोपशीर अन नीटनेटके, मग आम्ही का जाऊ नये इथे??

     कुणी असेही म्हणेल की ही परंपरा काही आजची नाही अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा IAS किंवा इतर परीक्षा देऊन परदेशात शिकायला येणार्‍यांची संख्या भरपुर होती अन तिथूनची ही सुरुवात झाली.. आम्हाला दोष देऊन काय फायदा..

--निलेश सकपाळ
(३० जुलै २००९)
----------------

                 (साभार आणि सौजन्य-निलेश सकपाळ.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.