माझी भटकंती...-माझी फ़ोटोग्राफ़ी-डेमाँस्ट्रेशन ....क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 19, 2022, 11:15:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "माझी भटकंती..."
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री विशाल विजय कुलकर्णी यांच्या "माझी भटकंती..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "माझी फ़ोटोग्राफ़ी-डेमाँस्ट्रेशन ...."

                 शिर्षक: माझी फ़ोटोग्राफ़ी-डेमाँस्ट्रेशन ....क्रमांक-१--
                --------------------------------------------

              २ सप्टेंबर २०१०

     भल्या पहाटे आठ-साडे आठच्या दरम्यान मोबाईल बोंबलला.
"च्यामारी, सकाळ सकाळ कोण पेटलाय आता. घरी बायको उठवते सकाळी सकाळी, निदान घरापासुन दुर आल्यावर तर निवांत झोपू द्या लेको!"

मी तणतणतच उठलो आणि फ़ोन घेतला.

"विशल्या, पशा बोलतोय, आलास का बे दिल्लीत?"

"प्रसन्ना, तू आहेस होय? साल्या एवढ्या सकाळी उठवत असतेत होय रे. एकतर काल रात्री १ वाजला हॉटेलवर यायला. मीरतवरुन दिल्लीलाच पोचलो साडेअकराला, तिथुन टॅक्सी वगैरे ठरवून गुरगावला हॉटेलवर येइपर्यंत दिड वाजला. झोपायला दोन आणि सकाळ होत नाहीतर तू उठवतोयस्.कुठे फेडशील ही पापे? साल्या तुझ्या सात पिढ्या नरकात जातील."

"सॉरी यार, राहवलं नाही. इतक्या दिवसांनी भेटतोयस भXX ! बरं ते सोड, किती वाजता भेटतोयस ते सांग?"

"अरे सकाळी एक डेमो आहे माझा. आता ९.३० वाजता गाडी येइल. १० वाजता क्लायंटच्या हापिसात, ११ वाजेपर्यंत डेमो आटपेल त्यानंतर डेटा डाऊनलोड करुन द्यायला ५-१० मिनीट. १०-१५ मिनीट बिनकामाच्या गोष्टी डिस्कस करुन झाले की मी रिकामा. साधारण १२-१२.३० पर्यंत कॅनॉट प्लेसला पोहोचेन. तू तिथेच भेट मला. ओक्के?"

"डन, माय डिअर! आय एम लै एक्सायटेड यार विशल्या. साल्या ११ वर्षांनी भेटतोय आपण्.माहितीय?"

"खरच रे, कॉलेज संपल्यानंतर काळ कसा गेला काही कळालेच नाही. आपण भेटू यार नक्कीच. मी गुरगाववरून निघताना फोन करेन."

     त्यावेळी जर माहीत असतं की आजची संध्याकाळ पश्याच्या शिव्या खाण्यात जाणार आहे तर ......

               फ्लॅशबॅक....

     ३१ ऑगस्ट २०१० च्या सकाळी १० वाजता मुंबईहुन उडालो, दिडच्या दरम्यान (एअर ट्रॅफिकचा नेहमीचा घोळ) दिल्लीत उतरलो. तरी बरे वातावरण बर्‍यापैकी शांत होते वर. निळे पांढरे ढग मस्त दिसत होते.....मेघदुत

     पाठीवरची लॅपटॉपची सॅक सांभाळत कन्वेयर बेल्टपाशी लगेज ताब्यात घेण्यासाठी हजर झालो.
दुपारी ३.२५ ची नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरुन डेहराडुनला जाणारी जनशताब्दी पकडून मीरत गाठायचे होते. १५ मिनीटे बेल्टपाशी उभा होतो,  सगळे जण आपापल्या बॅगा घेवुन जात होते. आता बेल्टवरच्या बॅगाही कमी-कमी होत संपत आल्या होत्या. आमच्या लगेजचा पत्ताच नाही. जाम तंतरली. माझ्या हार्डकेसमध्ये जवळपास १४ लाखाची डिजीपीएस युनीटस होती हो....

--विशाल विजय कुलकर्णी
(९/१४/२०१०)
----------------------

                    (साभार आणि सौजन्य-येडचॅप.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                   ------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.