मी पाहिलेला पहिला पाऊस

Started by nikhil@39, September 22, 2022, 11:40:32 PM

Previous topic - Next topic

nikhil@39

पण मला अजूनही आठवतोय तो पहिला पाऊस
माझ्या कौलारू घरातून आत
थप-थप गळणारा
सतरा घराच्या फटीतून आत
झिर-झिर झिरपणारा
जिथं गळायचं तिथं भांडं असायचं
तरीही घर ओल करणारा
पहिला पाऊस
पोरं रस्त्यावर फिरायची  पावसात
आम्ही मात्र भिजायचो घरच्या घरात
तुडुंब शेत, पाणी भरायचं नदी-नाल्यात
आमचे टोप भरायचे-भरायची पिठाची परात
छत्री कुठली गोणपाटाचं खोलडं
कपडे भिजायचे काहीच नसायचं कोरडं
चीक चीक मातीत पाय
फटीतून बोटांच्या चिखल यायचा वरती
तरीही धुंद सारे आम्ही हिरवीगार दिसायची  धरती
फुलपाखरू मनसोक्त बागडती
रानात कोकिळा  मंजुळ गाणी गती
मोर पिसारा फुलवती
पाऊस धारा बरसती भु वरती
या सरीवर सरी
तापलेल्या मातीला आणि मनाला
गारवा देणारा पहिला पाऊस
सुकलेल्या झाडांना सृष्टीला
हिरवा करणारा पहिला पाऊस
आम्हा मुलांना आणि साऱ्यांनाच
चिंब भिजवणारा पहिला पाऊस


    :-*निखिल अनंत भडेकर :-*