* आदिशक्तीचे भक्तगण ज्योत आणण्या गेले *

Started by Sanjay Makone, September 24, 2022, 02:34:35 PM

Previous topic - Next topic

Sanjay Makone

खालील कविता हि नवरात्र उत्सवात गावातील काही तरुण ज्योत आणण्यासाठी जातात ( शक्ती पिठामधून )आणि ते जेव्हा परत ज्योत घेऊन गावी येतात त्यावेळी ते थोडे भावनिक होतात. कारण गेली पाच ते सहा दिवस ते देवीचे तेज त्यांनी आपल्या बरोबर ठेवले होते. व त्या ज्योतीला मनापासून जपले होते,नव्हे ते त्या ज्योतिषी एकरूप झाले होते.म्हणून ज्योत देवळामध्ये ठेवताने त्यांच्या मनाच्या भावना या मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे   



* आदिशक्तीचे भक्तगण ज्योत आणण्या गेले *



आदिशक्ती भक्तगण 
ज्योत आणण्यास गेले, 
शक्तीपिठा पासून ते   
अनवाणी गावी आले.

नव्हे मशाल पेटती   
चैतन्य घेतले हाती,   
अभिमानाने ती त्यांची 
फुलारली होती छाती. 

तेजस्वी रूप पाहता, 
संचारली जणू शक्ती,   
चालताने आदिशक्ती
ती पदोपदी  संगती.

घटस्थापने दिवशी 
वेशीपाशी आले सारे, 
विरहाचे जणू आता 
घोंगाऊ लागले वारे. 

ठेवता ज्योत रावळी 
पाय निघेना माघारी, 
भासे उभा वारकरी
सोडताना ती पंढरी... सोडताना ती पंढरी

             
                                         संजय माकोणे........9623949907