नांदी ...

Started by Vkulkarni, July 29, 2010, 02:48:52 PM

Previous topic - Next topic

Vkulkarni


आकाशी जलद जलद नाचू लागले
आषाढसरी, मन माझे न्हाऊ लागले!

दरवळ तो मातीचा मनास मोहवी
वर्षेचे कंजन, बघ कानी गुंजू लागले!

मग खेळणे वर्षेच्या धारांशी वार्‍याचे
मनात आगळे, अलगुज छेडू लागले!

संपले बघ वाट पाहणे ते चातकाचे
आनंदविभोर, मोर वनी नाचू लागले!

रोमांचित जाहली बघ तृषार्त धरा
नग्ननिखळ, हास्य तिचे फुलू लागले!

विशाल
[/color]