सुधीर फडके-तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे

Started by Atul Kaviraje, September 28, 2022, 09:10:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्री सुधीर फडके यांनी गायिलेले एक गीत. या गाण्याचे शीर्षक आहे- "तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे"

                             "तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे"
                            --------------------------------

तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे

शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे

मोर केशरांचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहु दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेउन येती गंधधुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे

एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहु दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे

============
गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
स्वर : सुधीर फडके
============

--प्रकाशक : शंतनू देव
(FRIDAY, JULY 15, 2011)
----------------------------

                (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                           (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
               -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.09.2022-बुधवार.