१०-ऑक्टोबर-दिनविशेष-ब

Started by Atul Kaviraje, October 10, 2022, 08:49:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.१०.२०२२-सोमवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                               "१०-ऑक्टोबर-दिनविशेष"-ब
                              --------------------------

-: दिनविशेष :-
१० ऑक्टोबर
जागतिक मानसिक आरोग्य दिन
जागतिक मृत्यूदंड निषेध दिन
राष्ट्रीय टपाल दिवस
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  ------------------------------
१९५४
रेखा
रेखा – दोन तीन पिढ्यातील चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी चित्रपट अभिनेत्री
१९१६
डॉ. लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक
(मृत्यू: २० मे १९९२)
१९१०
शिजियाझुआँग, हेबेई, चीन येथील पुतळा
शिजियाझुआँग, हेबेई, चीन येथील डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा पुतळा
डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक
(मृत्यू: ९ डिसेंबर १९४२)
१९०९
एन. डी. नगरवाला
क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक
(मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८ - पुणे, महाराष्ट्र)
१९०६
आर. के. नारायण
२००९ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – प्रतिथयश लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण (१९६४), पद्मविभूषण (२००१), साहित्य अकादमी पारितोषिक व ए. सी. बेन्सन पदक (१९८०) या सन्मानांनी गौरविण्यात आले होते. राज्यसभा सदस्य (१२ मे १९८६ ते ३१ मे १९९२). 'द गाईड', 'सॉरी नो रूम', 'द वर्ल्ड ऑफ नागराज', 'वेटिंग फॉर महात्मा' इ. कादंबर्‍या, तसेच 'मालगुडी डेज', 'ए हॉर्स अँड टू गोट्‌स' इ. कथासंग्रह अतिशय लोकप्रिय झाले. 'द गाईड' ही त्यांची कादंबरी देशातील अनेक विद्यापीठांत बी. ए. (इंग्लिश) च्या अभ्यासक्रमात होती. या कादंबरीवर चित्रपटही निघाला आहे.
(मृत्यू: १३ मे २००१)
१९०२
के. शिवराम कारंथ
के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते, विचारवंत आणि व्यासंगी विद्वान. त्यांना साहित्य अकादमी पारितोषिक (१९५९), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (१९७३), ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८), साहित्य अकादमी फेलोशिप (१९८५), पद्मभूषण इ. सन्मानांनी गौरविण्यात आले होते. इंदिरा गांधी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ त्यांनी आपला पद्मभूषण पुरस्कार परत केला होता.
(मृत्यू: ९ डिसेंबर १९९७ - मणिपाल, कर्नाटक)
१८९९
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक संस्थापक सदस्य व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते, गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष, चौथ्या लोकसभेतील खासदार (मुंबई दक्षिण-मध्य). त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांना तत्कालीन सोविएत संघराज्यातर्फे 'ऑर्डर ऑफ लेनिन' सन्मान प्रदान करण्यात आला.
(मृत्यू: २२ मे १९९१)१८७१
शंकर श्रीकृष्ण देव
शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक
(मृत्यू: २३ एप्रिल १९५८)
१८४४
बद्रुद्दिन तैय्यबजी
बद्रुद्दिन तैय्यबजी – कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले प्रभारी मुख्य न्यायमूर्ती
(मृत्यू: १९ ऑगस्ट १९०६ - लंडन)
१७३१
हेन्‍री कॅव्हँडिश
हेन्‍री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि अरगॉन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, पृथ्वीची घनता मोजणारा पहिला शास्त्रज्ञ
(मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१०)
=========================================

POSTED------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.10.2022-सोमवार.