१४-ऑक्टोबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, October 14, 2022, 09:13:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.१०.२०२२-शुक्रवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                 "१४-ऑक्टोबर-दिनविशेष"
                                ------------------------

-: दिनविशेष :-
१४ ऑक्टोबर
दिवसमहिना
आंतरराष्ट्रीय मानक दिवस
World Standards Day
जागतिक दृष्टी दिन
World Sight Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९८
विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर
१९८१
अन्वर साद्त यांच्या हत्येनंतर एक आठवड्यानी उपराष्ट्राध्यक्ष होस्‍नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
१९५६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.
१९४७
चार्ल यॅगर या वैमानिकाने X-1 या विमानातून पहिले यशस्वी स्वनातीत (ध्वनीपेक्षा जास्त वेगाने) उड्डाण केले. याआधी मानवरहित स्वनातीत उड्डाणे झाली होती.
१९३३
राष्ट्रसंघातुन (League of Nations) नाझी जर्मनीने अंग काढुन घेतले.
१९३३
रिगल चित्रपटगृह
मुंबईतील (कुलाबा) रिगल चित्रपटगृहाचे उद्घाटन झाले.
१९२०
ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली.
१९१२
मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे निवडणूक प्रचाराचे भाषण करत असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर इसमाने खूनी हल्ला केला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्ट यांनी आपले भाषण पूर्ण केले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५५
उस्ताद शाहिद परवेझ – इटावा घराण्याचे सतारवादक
१९३६
सुभाष भेंडे – लेखक
(मृत्यू: २० डिसेंबर २०१०)
१९३१
निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक. ते इटावा घराण्याच्या सातव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात.
(मृत्यू: २७ जानेवारी १९८६)
१९२७
रॉजर मूर – जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता
(मृत्यू: २३ मे २०१७
१९२४
वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक
(मृत्यू: ६ ऑगस्ट १९९७)
१८९०
ड्वाईट आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २८ मार्च १९६९)
१८८२
इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २९ ऑगस्ट १९७५)
१७८४
फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा
(मृत्यू: २९ सप्टेंबर १८३३)
१६४३
बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट
(मृत्यू: २७ फेब्रुवारी १७१२)
१५४२
बादशाह अकबर
बादशाह अकबर – तिसरा मुघल सम्राट
(मृत्यू: २७ आक्टोबर १६०५)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१३
मोहन धारिया – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते
(जन्म: १४ फेब्रुवारी १९२५)
२००४
दत्तोपंत ठेंगडी – स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक
(जन्म: १० नोव्हेंबर १९२०)
१९९९
ज्यूलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १३ एप्रिल १९२२)
१९९८
डॉ. भालचंद्र पंढरीनाथ बहिरट – वारकरी संप्रदायाचे अभ्यासक व संशोधक
(जन्म: ????)
१९९७
हेरॉल्ड रॉबिन्स – अमेरिकन कादंबरीकार
(जन्म: २१ मे १९१६)
१९९४
सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, 'गॅझेटियर्स'चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व. गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलिंवर त्यांनी लिखाण केले. 'जीवनसेतू' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(जन्म: २७ ऑगस्ट १९१०)
१९९३
लालचंद हिराचंद दोशी – वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष, पद्मश्री (१९९२)
(जन्म: ? ? १९०४)
१९५३
रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र
(जन्म: १४ जानेवारी १८८२)
१९४७
साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा 'तात्यासाहेब' केळकर – लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून 'केसरी' व 'मराठा'चे संपादन केले. कायदेमंडळाचे सभासद, दहा नाटके, आठ कादंबर्‍या, दोन कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि विवेचनात्मक ग्रंथ इ. त्यांची साहित्यसंपदा आहे.
(जन्म: २४ ऑगस्ट १८७२)
१९४४
एर्विन रोमेल – जर्मन सेनापती
(जन्म: १५ नोव्हेंबर १८९१)
१९१९
जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती
(जन्म: ३० जुलै १८५५)
१२४०
रझिया सुलतान – भारतातील पहिली महिला राज्यकर्ती
(जन्म: ? ? १२०५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.10.2022-शुक्रवार.