इतर कविता-(क्रमांक-15)- मुसळधार पाऊस……

Started by Atul Kaviraje, October 15, 2022, 10:31:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     इतर कविता 
                                    (क्रमांक-15)
                                   -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "इतर  कविता"  अंतर्गत  मी  इतर  कवींच्या  कविता  आपणापुढे  सादर  करीत आहे .

                                  मुसळधार पाऊस......
                                 ----------------

मुसळधार पाऊस......
ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का..
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
इवलासा मेल वाचून बघ...
बघ माझी आठवण येते का????

वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
डोळे मिटुन घे.तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.
इनबॉक्स वर ये.तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग.
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.
वाचत राहा मेल संपेपर्यंत.
तो संपनार नाहीच.
शेवटी मेल बंद कर.डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस.
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.
आता दुसऱ्या मेलची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का???.

घड्याळात पाच वाजतील.
तुला निघायची घाई असेल.
तितक्यात एक मेल येईल.
तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ.
तो विचारील तुला मेल न करण्याचे कारण.
तु म्हण सर्व्हर डाऊन होता.
मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर..तुही वाच.
तो पुन्हा फॉरवर्ड करेल.
तू तो डीलीट कर.
एखादी कविता वाच.
बघ माझी आठवण येते का???

मग निघायची वेळ होईल.
तरी पुन्हा मेल येईल.
तो म्हणेल काळजी घे स्व:ताची..,
मग तुही तसेच लिही.
मेल मागून मेल येतील.
फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होतील.
शेवटी सगळे डीलीट कर.
आता रिकाम्या इनबॉक्स कडे बघ.
बघ माझी आठवण येते का..????

यानंतर लॉग आऊट व्हायला विसरु नकोस.
या नंतर पिसी बंद करण्याचा प्रयत्न कर.
या नंतर...ऑफिस मधुन बाहेर ये.
घरी लवकर जाण्याचा प्रयत्न कर.
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी.... मेल करताना...
बघ माझी आठवण येते का???

– प्रशांत रेडकर
--------------
संकलक- सुजित बालवडकर
-------------------------

                 (साभार आणि सौजन्य-मराठीकविता.वर्डप्रेस.कॉम)
                --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.10.2022-शनिवार.