१६-ऑक्टोबर-दिनविशेष-अ

Started by Atul Kaviraje, October 16, 2022, 09:52:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१६.१०.२०२२-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                "१६-ऑक्टोबर-दिनविशेष"
                               -----------------------

-: दिनविशेष :-
१६ ऑक्टोबर
जागतिक अन्न दिन
World Food Day
माणसाला चवीचे ज्ञान होते ते जिभेवर असलेल्या चवकलिकांमुळे. चर्वण करणार्‍या प्राण्यांमध्ये चवकलिकांची संख्या जास्त असते. माणसात चवकलिकांची संख्या सुमारे तीन ते दहा हजार इतकी असते. डुकरांमध्ये ती असते साडेपाच हजार, गायींमध्ये पस्तीस हजार तर हरणांमध्ये असते तब्बल पन्नास हजार ! चर्वण न करणार्‍या प्राण्यांमध्ये मात्र चवकलिकांची संख्या अगदी कमी असते. पक्ष्यांमध्ये चवकलिकांची संख्या पन्नास ते पाचशे एवढीच असते.
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९९
गीत सेठी
जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा 'फ्रेड डेव्हिस पुरस्कार' भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.
१९८४
आर्चबिशप डेसमंड टुटू
आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९७५
रहिमा बानू बेगम
बांगला देशातील रहिमा बानू बेगम ही ३ वर्षाची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली. १६ ऑक्टोबर १९७२ मध्ये जन्मलेल्या या मुलीला देवी झाल्याचे १६ ऑक्टोबर १९७५ रोजी लक्षात आले.
१९७३
हेन्‍री किसिंजर आणि ली डक थो
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेन्‍री किसिंजर आणि व्हिएतनामचे नेते ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र ली डक थो यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.
१९६८
हर गोविंद खुराना
हर गोविंद खुराना यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (संयुक्त) प्रदान
१९५१
लियाकत अली खान
१९४५ मधील छायाचित्र
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.
१९२३
द वॉल्ट डिस्‍ने कंपनी
द वॉल्ट डिस्‍ने कंपनी
वॉल्ट डिस्‍ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्‍ने यांनी 'द वॉल्ट डिस्‍ने कंपनी'ची स्थापना केली.
१९०५
लॉर्ड कर्झन
भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.
१८६८
डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.
१८४६
डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.
१७९३
फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा 'गिलोटीन'वर वध करण्यात आला.
१७७५
ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००२
नागनाथ संतराम तथा 'ना. सं.' इनामदार – लेखक. शहेनशहा, राऊ, झुंज, राजेश्री, शिकस्त, मंत्रावेगळा, झेप इ. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या खूप गाजल्या आहेत.
(मृत्यू: २३ नोव्हेंबर १९२३)
१९९७
दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक (Cinematographer)
(मृत्यू: ? ? ????)
१९८१
मोशे दायान
मोशे दायान – इस्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख आणि मुत्सद्दी
(जन्म: २० मे १९१५)
१९५१
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्या समवेत लियाकत अली खान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्या समवेत
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या
(जन्म: १ आक्टोबर १८९५ - उत्तर प्रदेश, भारत)
१९४८
माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले 'म्युनिसिपालिटी' हे नाटक त्यांनी लिहिले होते.
(जन्म: ? ? १८८५)
१९४४
गुरुनाथ प्रभाकर ओगले – उद्योजक, 'प्रभाकर कंदिल'चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक
(जन्म: ? ? १८८७)
१९०५
पंत महाराज बाळेकुन्द्री
दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी तथा पंत महाराज बाळेकुन्द्री – अवधूत नवनाथ संप्रदायाचे आध्यात्मिक गुरू
(जन्म: ३ सप्टेंबर १८५५)
१७९३
मेरी आंत्वानेत
१७७८ मधील प्रतिमाचित्र
मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी
(जन्म: २ नोव्हेंबर १७५५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.10.2022-रविवार.