मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-6-माझे बाबा

Started by Atul Kaviraje, October 19, 2022, 09:27:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-6
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझे बाबा"

     एक वडीलच मुलासाठी आदर्श असू शकतात आणि म्हणूनच माझे बाबा माझ्यासाठी आदर्श आहेत. एक चांगले व्यक्ती, चांगले वडील,चांगले पुत्र व चांगले पती कसे असावे हे माझ्या बाबांना पाहून लक्षात येते.

     माझे बाबा माझ्यासाठी मित्राप्रमाणे आहेत, एक असा मित्र जो मला वेळोवेळी चांगले-वाईट चा आभास करून देतो. बाबा नेहमी माझे धैर्य वाढवतात आणि म्हणतात की जीवनात कधीही हार मानू नकोस, प्रत्येक परिस्थितीत प्रयत्न करीत रहा. ज्याप्रमाणे एक मित्र आपल्या सोबत गप्पा गोष्टी करतो त्या पद्धतीनेच माझे बाबा माझ्यासोबत व्यवहार करतात. ते माझ्या प्रत्येक गोष्टीला लक्ष देऊन ऐकतात व माझ्या समस्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न करतात.

     एका वडिलां शिवाय कोणीही चांगला मार्गदर्शक असू शकत नाही. वडिलांकडे ज्ञानाचा भंडार असतो. माझ्या बाबाचे देखील असेच आहे. लहापणापासुनच ते माझे सर्वात चांगले गुरु आहेत. बाबांनी मला चालणे शिकवले, मला चांगल्या गोष्टी शिकवल्या माझ्यासाठी काय चांगले व काय वाईट आहे याची ओळख त्यांनी करून दिली. जेव्हा केव्हा मला एखाद्या समस्येचे निवारण करायचे असेल तेव्हा ते माझ्या सोबत ठामपणे उभे असतात.

     माझे बाबा एक धैर्यवान व्यक्ती आहेत. परिस्थिती कशीही असो ते आपले धैर्य कधीही कमी होऊ देत नाहीत. ते कधीही माझ्यावर किंवा माझ्या आईवर रागावत नाही. बाबांनी मला शिस्तीचे महत्व समजावले आहे. त्यांचे म्हणणे आहे की शिस्तीने जगणारा व्यक्ती कधीही अयशस्वी होत नाही. सकाळी लवकर उठणे, वेळेवर कामाला जाने, वेळेवर भोजन करणे व इतर सर्व कामे ठरलेल्या वेळेनुसार करणे बाबांना आवडते.

     माझे आजी आजोबा देखील बाबांची खूप प्रशंसा करतात. माझ्या बाबांसारखा पुत्र मिळाल्याने ते अतिशय आनंदी आहेत. माझे बाबा दररोज आजी-आजोबांचे पाय पडून आशीर्वाद घेतात. त्यांचे मानणे आहे की मोठ्या म्हाताऱ्या लोकांचा आशीर्वाद घेतल्याने आयुष्यात सौभाग्य प्राप्त होते.

     जगातील सर्व कष्ट सहन करून वडील आपल्या इच्छा पूर्ण करीत असतात. लहानपणापासूनच ते आपल्या लहानसहान गरजांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. एक वडील प्रत्येक मुलासाठी ईश्वरा प्रमाणे पूजनीय असतात. म्हणून एका चांगल्या पुत्रप्रमाने आपणही त्यांच्यावर कधीही न रागावता, त्यांच्याशी प्रेमाने वागायला हवे व त्यांच्या म्हातारपणात त्यांना सन्मानाने ठेवायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.10.2022-बुधवार.