२४-ऑक्टोबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, October 24, 2022, 09:14:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२४.१०.२०२२-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "२४-ऑक्टोबर-दिनविशेष"
                                 ------------------------

-: दिनविशेष :-
२४ ऑक्टोबर
संयुक्त राष्ट्रसंघ दिन
जागतिक पोलिओ निर्मूलन दिन
जागतिक माहिती विकास दिन
World Development of Information Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०००
थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला. ६ डिसेंबर २००० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९७
सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा 'प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार' प्रदान
१९८४
भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९७२
दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी 'सकाळ रिलीफ फंड' या संस्थेतर्फे 'दत्तक बैल योजना' सुरू करण्यात आली.
१९६४
उत्तर र्‍होडेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९६३
देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
१९४५
संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
१९०९
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.
१६०५
मुघल सम्राट जहांगिरने आग्र्याची गादी सांभाळली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७६
रीमा लांबा ऊर्फ 'मल्लिका शेरावत' – अभिनेत्री व मॉडेल
१९२६
केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल (२००१-२००२), गोव्याचे राज्यपाल (२००२-२००४), दिल्लीचे महापौर
(मृत्यू: ३ आक्टोबर २०१२)
१९२१
रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी
(मृत्यू: २६ जानेवारी २०१५)
१९१४
लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन
(मृत्यू: २३ जुलै २०१२)
१९१०
'लीला' ऊर्फ माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री
(मृत्यू: ? ? ????)
१८६८
भवानराव श्रीनिवासराव तथा 'बाळासाहेब' पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते
(मृत्यू: १३ एप्रिल १९५१)
१७७५
बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा
(मृत्यू: ७ नोव्हेंबर १८६२)
१६३२
अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
(मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१३
प्रबोधचंद्र डे तथा 'मन्ना डे' – पार्श्वगायक. 'सीमा', 'बरसात की रात', 'दो बिघा जमीन', 'देख कबीरा रोया' आदी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली होती.
(जन्म: १ मे १९१९)
१९९५
माधवराव साने – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष
(जन्म: ? ? ????)
१९९२
अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, 'गंधवार्ता' या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना १९८४ मधे केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती.
(जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)
१९९१
इस्मत चुगताई – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका
(जन्म: १५ ऑगस्ट १९१५)
१६०१
टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले.
(जन्म: १४ डिसेंबर १५४६)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.10.2022-सोमवार.