मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-17-माझे शेजारी-आमचे शेजारी

Started by Atul Kaviraje, October 30, 2022, 09:46:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-17
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझे शेजारी-आमचे शेजारी"

     चांगले शेजारी हे एका आशीर्वादाप्रमाणे असतात. ते गरजेच्या वेळी एक दुसऱ्याची मदत करतात. चांगल्या शेजाऱ्यामुळे आयुष्य सुखी व आनंदी होते.

     म्हणून आपल्या शेजाऱ्यांशी नेहमी प्रेमाने वागायला हवे. आज आपण माझे शेजारी (Maze shejari) या विषयावरील मराठी निबंध मिळवणार आहोत तर चला सुरू करुया.

     शेजाऱ्यांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. नातेवाईक, भाऊ बंधू आणि मित्र मंडळी ज्यावेळी आपल्या सोबत राहत नाही त्या परिस्थितीत शेजारीच आपल्या मदतीला धावून येतात. म्हणून जर शेजारी चांगला असेल तर आयुष्य आनंदी होते पण जर शेजारी दृष्ट असला तर त्याच्या त्रासामुळे आयुष्यातील आनंद हरवून जातो.

     आमच्या शेजाऱ्यांचे नाव श्रीराम प्रसाद आहे. त्यांचे वय जवळपास 40 वर्षे आहे व ते एक व्यापारी आहेत व आपल्या कुटुंबासोबत आमच्या घरा बाजूला राहतात. ते शरीराने धष्टपुष्ट आणि साहसी आहेत. ते दररोज सकाळी लवकर उठून फिरायला जातात. घरी आल्यावर स्नान करून ते देवाची पूजा करतात. यानंतर आपल्या दुकानाच्या कामावर निघतात. ते अतिशय दयाळू आणि मार्मिक स्वभावाचे आहेत, म्हणूनच त्यांचे ग्राहक त्यांच्या पासून नेहमी खुश राहतात.

     श्रीरामप्रसाद आणि आमच्या कुटुंबाचे संबंध खूप चांगले आहेत. ते त्या शेजाऱ्यांप्रमाने अजिबात नाही जे दुःखात पाठ फिरवतात. ते अतिशय विनम्र, उदार आणि मिळूनमिसळून राहणारे व्यक्ती आहेत. ते कोणालाही दुःखात पाहू शकत नाही, इतरांच्या सहायतेसाठी ते नेहमी पुढे येतात. आमच्या कॉलनी मध्ये त्यांच्या स्वभावामुळे सर्व जण त्यांना ओळखतात.

     श्रीरामप्रसाद खरोखर एक आदर्श शेजारी आहेत. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी साधनाबाई व मुलगा महेश आहे. महेश दादा हा कॉलेज मध्ये शिकतो. मला अभ्यासात काहीही अडचण आली तर तो मला मदत करतो. तो अभ्यासात हुशार आहे, म्हणून मी देखील माझ्या शाळेच्या अभ्यासाविषयी समस्या त्याला विचारून घेतो. महेश दादा ची आई साधना काकू व माझी आई नेहमी गप्पागोष्टी करतात. घरात बनवलेले वेगवेगळे पदार्थ एकमेकांना देतात. कुठेही बाहेर फिरायला किंवा बाजारात भाजीपाला घ्यायला जायचे असेल तर आई व साधना काकू सोबतच जातात.

     श्रीरामप्रसाद यांचे संपूर्ण कुटुंब मनमिळावू आहे. आज आमचे व त्यांचे कुटुंब जवळपास 10 वर्षांपासून शेजारी राहत आहे. परंतु आम्हा दोघी कुटुंबांचे कधीही भांडण झाले नाही आहे. आणि आमच्या मधील प्रेमाचे कारण आहे श्रीरामप्रसाद यांच्या कुटुंबाचा स्वभाव. त्यांनी आपल्या वागणुकीने एका आदर्श शेजाऱ्याच्या उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. खरोखर इतके चांगले शेजारी मिळाल्याने आम्ही स्वताला भाग्यवान समजतो. व परमेश्वराचे आभार मानतो.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.10.2022-रविवार.