०५-नोव्हेंबर-दिनविशेष-ब

Started by Atul Kaviraje, November 05, 2022, 08:59:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.११.२०२२-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "०५-नोव्हेंबर-दिनविशेष"
                                 ----------------------

-: दिनविशेष :-
०५ नोव्हेंबर
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०११
भूपेन हजारिका
२०१६ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
भूपेन हजारिका – संगीतकार, गीतकार, गायक, कवी, चित्रपट निर्माते. उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाबद्दल राष्ट्रीय पारितोषिक (१९७५),संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९८७), पद्मश्री (९१८७), दादासाहेब फाळके पारितोषिक (१९९२), पद्मभूषण (२००१), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (२००८), पद्मविभूषण (२०१२ - मरणोत्तर), भारतरत्न (२०१७ - मरणोत्तर). भारतीय जनता पक्षाचे नेते.
(जन्म: ८ सप्टेंबर १९२६)
१९९१
शकुंतला विष्णू गोगटे – कथालेखिका व कादंबरीकार. त्यांच्या 'किती रंगला खेळ', 'चंदनाची उटी', 'कशाला उद्याची बात' इ. पन्नास कादंबर्‍या आणि 'झपूर्झा', 'सावलीचा चटका', 'मर्यादा' इ. तीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
(जन्म: ? ? १९३०)
१९५०
फैयाज खाँ – हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभाशाली गायक (आग्रा घराणे), त्यांनी 'प्रेमपिया' या टोपणनावाने अनेक चिजा बांधल्या.
(जन्म: ? ? १८८०)
१९१५
सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक
(जन्म: ४ ऑगस्ट १८४५)
१८७९
जेम्स क्लार्क मॅक्सवेल – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ
(जन्म: १३ जून १८३१ - एडिंबर्ग, यु. के.)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.11.2022-शनिवार.