मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-24-Best Friend-माझा आवडता मित्र

Started by Atul Kaviraje, November 06, 2022, 10:15:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-24
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "[Best Friend]-माझा आवडता मित्र"

       मित्र हा असा व्यक्ती असतो जो सुख दुःखात कायम सोबत असतो तसे पाहता शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे खूप सारे मित्र मैत्रिणी असतात. पण कोणीतरी असं असतो जो आपला प्रिय मित्र म्हणजेच बेस्ट फ्रेंड असतो. आजचा आपला हा निबंध त्याच विषयावर आधारित आहे. माझा आवडता मित्र असे आपल्या निबंधाचे शीर्षक आहे. या निबंधात तुम्हाला Maza avadta mitra nibandh हि माहिती मिळणार आहे.

     माझे नाव निलेश आहे आणि मी कस्तुरबा माध्यमिक विद्यालय सातारा येथील विद्यार्थी आहे. मी सातव्या इयत्तेत शिकत आहे. तसे पाहता माझ्या वर्गात 40 विद्यार्थी आहेत पण या सर्वामध्ये अजय माझा आवडता मित्र आहे. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. अजय हुशार विद्यार्थी आहे, तो खूप मेहनती पण आहे. असे म्हणतात की ज्याचे मित्र नाही राहत तो खूपच दुर्भग्याशाली असतो. आजच्या या जगात खरा मित्र मिळणे फारच कठीण आहे. पण या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे कारण माझ्याकडे अजय सारखा खरा, इमानदार आणि मेहनती मित्र आहे.

     अजयच्या कुटुंबातील सदस्य पण स्वभावाने अतिशय चांगले आहेत. त्याचा वडिलांचे इलेक्ट्रिक वस्तूचे शोरूम आहे. त्याची आई घरकाम करते. अजयच्या घरी माझे येणे जाणे कायम सुरू असते. त्याचे आईवडील सुद्धा मला माझ्या आईवडीलांसारखेच प्रेम करतात. कोणतीही समस्या असो अजय कायम माझ्या मदतीला उभा असतो. वर्गात सर्व विद्यार्थी आणि शिक्षक त्याची प्रशंसा करतात. एका चांगल्या मित्राचे सर्व गुण त्यांच्यात आहेत. शाळेत येताना अजय नेहमी स्वच्छ गणवेश घालून येतो. तो नियमित शाळेत येतो आणि शिक्षकाची आज्ञा पाळतो.

     या शिवाय अजय वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पण करतो. जरी त्याचे वडील श्रीमत् आहेत तरी अजयला या श्रीमंतीचा जरा सुद्धा अभिमान नाही. अजयने बऱ्याचदा आपल्या वडिलांना सांगून शाळेतील गरीब विद्यार्थ्यांची फी, पुस्तके, गणवेश इत्यादी गोष्टींची व्यवस्था करून दिली आहे. अजयच्या स्वभवाबरोबर त्याचे विचार पण खूप चांगले आहेत. तो कधीही आपला वेळ वाया घालवत नाही. शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये तो सहभाग घेतो. अजय ला क्रिकेट खेळायला खूप आवडते. म्हणून आम्ही रोज संध्याकाळी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर जातो.

     असे म्हणतात की ज्याचे मित्र नाही तो खूप दुखी असतो. पण कपटी मित्र असण्यापेक्षा नसलेला बरा. खरे मित्र आपले दुःख वाटून घेतात आणि आपला आनंद वाढवतात. खरे मित्र बनवावे लागत नाही ते आपोआप स्वभावाने बनून जातात. अश्या मित्रासोबत मित्रता दिवसेदिवस वाढत जाते. अश्याच मित्रांपैकी एक आहे अजय. अजय हा माझा खरा मित्र आहे आणि माझी देवाला प्रार्थना आहे की आमची मैत्री कायम टिकून राहो.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.11.2022-रविवार.