मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-26-माझे प्रेरक शिक्षक

Started by Atul Kaviraje, November 08, 2022, 09:35:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-26
                                ----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझे प्रेरक शिक्षक"

     कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक गोष्टी शिकवत असतात. शिक्षकाद्वारे मिळालेली शिक्षा विद्यार्थ्याचे आयुष्य बदलून टाकते. एक आदर्श शिक्षक स्वतः आधी आपल्या विद्यार्थ्याचा भविष्याचा विचार करतो. शाळेत प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्याला समान असतात कारण प्रत्येक शिक्षक त्यांना ज्ञान देण्याचे काम करतात. परंतु केव्हा केव्हा एखादे शिक्षक विद्यार्थ्याचे अती प्रिय बनून जातात. एखादे शिक्षक अधिक आवडण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

     माझे सुद्धा एक आवडते शिक्षक आहेत, मी त्यांचा स्वभाव आणि शैक्षणिक उत्कृष्टेमुळे अती प्रभावित झालो आहे. ज्या शिक्षकांनी मला प्रभावित केले आहे त्यांचे नाव आहे गजानन गुरव सर. गजानन सर उत्कृष्ट शिक्षक आहेत. ते आमच्या शाळेत गणित विषय शिकवतात. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ते प्रिय आहेत. सर्वच विद्यार्थी त्यांची प्रशंसा व सन्मान करतात.

     गजानन सरांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते सर्व विद्यार्थ्यांना समान व्यवहार देतात आणि सर्व विद्यार्थ्यांशी विनम्रता आणि प्रेमळपणे बोलतात. या शिवाय त्यांना शिस्त अतिप्रिय आहे जर कोण्या विद्यार्थ्याने मस्ती केली किंवा होमवर्क पूर्ण केला नाही तर गजानन सर त्याला शिक्षा पण करतात. एवढे असूनही मला गजानन सर खूप आवडतात.

     एक शिक्षक हा कुंभारI प्रमाणे असतो. कुंभार ज्या प्रमाणे माती ची भांडे बनवताना त्याला एका हाताने सांभाळून दुसऱ्या हाताने आकार देतो, त्याच प्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देतात. शिक्षक शिवाय चांगला समाज तयार होणे असंभव आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या फक्त प्रिय शिक्षक नाही तर सर्वच शिक्षकांना समान सम्मान द्यायला हवा.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.11.2022-मंगळवार.