मला आवडलेला लेख-क्रमांक-१-आत्मा आणि मानवी मेंदू-अ

Started by Atul Kaviraje, November 08, 2022, 09:43:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                       लेख क्रमांक-१
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "आत्मा आणि मानवी मेंदू"

                                 आत्मा आणि मानवी मेंदू--
                                ---------------------

"इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:।मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स:।" [गीता ४२/३]

     गीतेतील या श्लोकात इंद्रिये (ज्ञानेंद्रिये+कर्मेंद्रिये), मन आणि बुद्धी यांचा उल्लेख आहे.मात्र बुद्धीचे तसेच मनाचेही अधिष्ठान असलेल्या मेंदूचा उल्लेख नाही.संपूर्ण गीतेत मेंदू अथवा त्या अर्थाचा अन्य कोणताही शब्द नाही."गीर्वाणलघुकोशा"त मेंदू हा शब्द नाही.पुढे शोध घेता समजले की आपण आज ज्या अर्थाने मेंदू हा शब्द वापरतो त्या अर्थाचा एकही शब्द वेद आणि उपनिषदे यांतही नाही.(मेंदू" या शब्दाची व्युत्पत्ती काय तीही मला ठावूक नाही.शोधून कुठे सापडली नाही.मेंदूसाठी मस्तिष्क,मस्तुलुंग असे समानार्थी शब्द आहेत.) याचा अर्थ असा नव्हे की डोक्याच्या कवटीत सुरक्षितपणे असलेला मेंदू हा अवयव त्याकाळी ठावूक नव्हता. यज्ञात अनेक पशू बळी देत.अश्वाच्या प्रत्येक अवयवाचे नाव घेऊन,"स्वाSहा स्वाSहा" म्हणत त्या त्या अवयवाची आहुती हवनात टाकीत.तसेच मांसाहारासाठी बोकड,बैल,गाय असे पशू कापीत.तेव्हा पशूंचे सर्व अवयव वेदकालीन माणसाला ज्ञात होते.हाडात जसा पांढरा-पिवळा मगज असतो तसा प्राण्यांच्या डोक्याच्या कवटीत फिकट गुलाबी-राखी रंगाचा मगज असतो.माणसाच्या डोक्यातही तसा असणार एवढे त्याकाळी कळत होते.पण त्याच्या कार्याविषयी काहीच कल्पना माणसाला नव्हती.शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करण्याची यंत्रणा त्या गुलबट रंगाच्या मगजात आहे याची कल्पना त्याकाळी जगात कुणालाच नव्हती.ते ज्ञान अगदी अलिकडचे आहे.माणसाच्या स्मृती,ज्ञान,मन, बुद्धी यांचे स्थान हृदयात आहे अशी पूर्वी सर्वांची समज होती.कारण हृदयाची धडधड कळत होती.ती थांबली की मृत्यू येतो हे दिसत होते. माणसाची कर्मेंद्रिये कोणती,ज्ञानेंद्रिये कोणती ,प्रत्येक इंद्रियाचे काम काय हे सहज समजत होते.पण इंद्रियांनी आपापली कामे करावी म्हणून त्यांना कोण प्रवृत्त करतो? ज्ञानेंद्रियांद्वारे झालेले ज्ञान नेमके कोणाला होते? ज्ञाता कोण? हे समजत नव्हते.केनोपनिषदात शिष्य गुरूंना विचारतो:--

"केनेषितां वाचमिमां वदन्ति? चक्षु: श्रोत्रं क उ देवो युनक्ति?"

[लोक ज्या वाणीने बोलतात त्या वाणीला बोलण्यास कोण प्रवृत्त करतो? डोळ्यांना आणि कानांना त्या त्या कामासाठी कोण नियुक्त करतो?]
ऐतरेय उपनिषदात आहे:--

"येन वा पश्यति ,ये न वा शृणोति,येन वा गंधानाजिघ्रति,येन वा वाचं व्याकरोति,येन वा स्वादु चास्वादु च विजानाति स आत्मा कतर:?"

[ज्याच्यामुळे माणूस (नेत्रांद्वारे) पाहातो,(कर्णाद्वारे) ऐकतो,(नाकाद्वारे) वास घेतो,वाचेद्वारे स्पष्ट बोलतो,(रसनेद्वारे) चविष्ट-बेचव जाणतो तो आत्मा कोण आहे?]
.....या प्रश्नाचे उत्तर ,"तो हृदयस्थ आत्मा परमात्म्याचा अंश आहे." असे दिले आहे.
त्याच उपनिषदात पुढे,

"संज्ञानं (सम्यक ज्ञान),आज्ञानं (आदेश देण्याची शक्ती),विज्ञानं (विभिन्न रूपांवरून वस्तू ओळखण्याची क्षमता),प्रज्ञानं (तात्काळ जाणण्याची शक्ती), मेधा,दृष्टि,धृति:,मति:,मनीषा(मनन करण्याची शक्ती),स्मृति:,संकल्प:,क्रतु:(मनोरथ शक्ती),असु:(प्राणशक्ती) ,काम: एतानि सर्वाणि प्रज्ञानस्य एव(जीवात्म्याचीच) नामधेयानि।

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(August 10, 2013)
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.11.2022-मंगळवार.