मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-29-माझा आवडता नेता-महात्मा गांधी

Started by Atul Kaviraje, November 11, 2022, 09:08:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-29
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता नेता-महात्मा गांधी"

     मित्रांनो भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी देशाच्या स्वतंत्र लढ्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. गांधीजींनी देशाला अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र मिळवून देण्यासाठी कार्य केले. आज भारतच नव्हे तर जगभरात गांधीजींचे अहिंसावादी विचार प्रसिद्ध आहेत.

     भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांच्या जन्म 2 ऑक्टोंबर 1869 साली गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला. 2 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून सुद्धा पाळला जातो. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते. पुतळाबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या आणि महात्मा गांधी हे त्यांचे शेवटचे अपत्य होते. महात्मा गांधींना ब्रिटिश शासनाविरुद्ध भारतीय राष्ट्रीय आंदोलनाचे नेता व भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते.

     गांधीजींची आई पुतळाबाई अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्री होत्या. त्यांच्या या स्वभावाचा परिणाम लहान मोहनदास यांच्यावर झाला आणि याच मूल्यांनी पुढे जाऊन त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मोहनदास स्वभावाने अहिंसा, शाकाहार आणि विविध धर्मातील मूल्यांना मानणारे होते.       

     सन 1883 मध्ये साडे तेरा वर्षाच्या वयात त्यांचे लग्न 14 वर्षाच्या कस्तुरबा यांच्याशी करण्यात आले. ज्यावेळी मोहनदास पंधरा वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या प्रथम मूल ने जन्म घेतला. परंतु काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. मोहनदास यांचे वडील करमचंद गांधी चे सुद्धा त्याच वर्षी 1885 मध्ये निधन झाले. यानंतर मोहनदास आणि कस्तुरबा यांना चार अपत्य झालीत.

     मोहनदास यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर मध्ये तर हायस्कूल चे शिक्षण राजकोट मध्ये पूर्ण झाले. शैक्षणिक स्तरावर मोहनदास एक सामान्य विद्यार्थी होते. सन 1887 मध्ये त्यांनी मॅट्रिक ची परीक्षा अहमदाबाद हून उत्तीर्ण केली. या नंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याना लंडन जाऊन बॅरिस्टर होण्याचा सल्ला दिला. वर्ष 1888 मध्ये मोहनदास युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी व बॅरिस्टर बनण्यासाठी इंग्लंडला गेले. जून 1891 मध्ये तीन वर्षांनी गांधीजी भारतात परत आले. भारतात आल्यावर त्यांना आपल्या आईच्या मृत्यूची सूचना मिळाली. यानंतर त्यांनी बॉम्बे येथे वकिली करणे सुरू केले. सन 1893 साली दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय केस ची वकिली करण्याच्या करार त्यांनी स्वीकारला. 24 वर्षाचे असताना गांधीजी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले. दक्षिण आफ्रिकेत त्यांना गंभीर वंशवाद आणि नस्ल भेदाचा सामना करावा लागला. या सर्व घटना त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण वळण बनल्या, दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाला पाहून त्यांच्या मनात इंग्रजीशासना अंतर्गत असलेल्या भारतीयांच्या सन्मान आणि आपली स्वतःची ओळख यासंबंधित प्रश्न उठायला लागले. यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना राजनेतिक आणि सामाजिक अधिकार प्राप्त करणे आणि त्यासाठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित केले.

     वर्ष 1914 मध्ये गांधीजी भारतात परत आले. या काळात ते एक राष्ट्रवादी नेता म्हणून प्रसिद्ध होऊन गेले होते. भारतात आल्यावर त्यांनी चंपारण व खेडा सत्याग्रह, खिलाफत आंदोलन, असहयोग आंदोलन, स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह, हरिजन आंदोलन, भारत छोडो आंदोलन असे एक न अनेक आंदोलने करून लोकांना इंग्रज शासनाविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने एकत्रित केले. 9 ऑगस्ट 1942 ला गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. भारत छोडो स्वतंत्रता आंदोलन त्या काळातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली आंदोलन बनून गेले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने स्वातंत्र्यसेनानी मारले गेले. यानंतर ब्रिटीश सरकारने महात्मा गांधी समेत अनेक मोठमोठ्या काँग्रेसच्या नेतांना तुरुंगात टाकून दिले. भारत छोडो आंदोलनाचा भारतीय जनतेवर खूप मोठा परिणाम झाला. लोक संघटित होऊन गेले. यानंतर दुसरे विश्व युद्धाच्या समाप्तीपर्यंत ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य करण्याचे संकेत देऊन दिले आणि अशा पद्धतीने सर्व नेत्यांना मुक्त करत भारताला स्वातंत्र्य मिळाले.

     30 जानेवारी 1948 महात्मा गांधी दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये एका प्रार्थनेला संबोधित करायला जात होते. संध्याकाळी 05:17 ला नाथूराम गोडसे नावाच्या एका कट्टरपंथी व्यक्तीने त्यांच्या छातीत तीन गोळ्या मारून त्यांची हत्या केली. असे मानले जाते की महात्मा गांधी यांचे शेवटचे शब्द 'हे राम' असे होते. यानंतर नाथूराम गोडसे व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला व 1949 मध्ये त्या सर्वांना मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.11.2022-शुक्रवार.