मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-32-माझा आवडता नेता-नरेंद्र मोदी

Started by Atul Kaviraje, November 14, 2022, 09:45:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-32
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता नेता-नरेंद्र मोदी"

     नरेंद्र मोदी हे असे व्यक्तिमत्व आहे जे देश असो वा विदेश सर्वकडे प्रसिद्ध आहेत. नरेंद्र सध्या भारताचे 15 वे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. सन 2014 मध्ये त्यांना पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले होते.

                  प्रारंभीक जीवन

     नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 डिसेंबर 1950 ला गुजरातमधील वडनगर या गावी एका ओबीसी हिंदू कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव हिराबेन तर वडिलांचे नाव दामोदरदास मुलचंद मोदी असे होते. नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिति फार चांगली नव्हती. त्यांचे वडील रस्ता व्यापारी होते. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. Narendra Modi यांच्या आई एक गृहिणी होत्या. कुटुंबाला मदत म्हणून नरेंद्र मोदी यांनी लहान असताना रेल्वे स्टेशन वर चहा विकली. मोदी यांनी आपल्या लहान वयातच अनेक समस्याचा सामना केला. परंतु त्यांनी आपल्या जिद्दीने सर्व बाधाना संधि मध्ये बदलून दिले.

                     शिक्षण व करियर

     नरेंद्र मोदी यांनी 1967 पर्यन्त आपले शिक्षण वडनगर मधील स्थानीय विद्यालयातून पूर्ण केले. कुटुंबाची आर्थिक स्थिति चांगली नसल्याने त्यांनी शिक्षण सोडून दिले व ते भारत भ्रमण करायला निघून गेले. हिमालय व भारतातील इतर ठिकाणी भ्रमण करून त्यांनी अनेक नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या.

     या नंतर सन 1978 मध्ये त्यांनी उच्च शिक्षणासाठी दिल्ली यूनिवर्सिटी व त्यानंतर अहमदाबाद यूनिवर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी राजनीति विज्ञानात पदवी मिळवली.

     नरेंद्र मोदी यांच्या शिक्षकानी दिलेल्या एक इंटरव्ह्यु मध्ये म्हटले की नरेंद्र मोदी अभ्यासात सामान्य विद्यार्थी होते पण ते आपला अत्यधिक वेळ वाचनालयात पुस्तके वाचत घालवत असत.

     नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या राजनैतिक करियर ची सुरुवात कॉलेज मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरू झाली. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभाग घेऊन राष्ट्रीय स्वयम सेवक संघाचे प्रचारक म्हणून काम सुरू केले.

     सन 1975-77 दरम्यान लावण्यात आलेल्या आपत्काळ मध्ये आरएसएस वर बंदी लावण्यात आली या मुळे त्यांना बराच काळ लपून राहावे लागले. 

     आपत्काळ च्या विरोधात नरेंद्र मोदी सक्रिय पणे उभे होते. त्या काळात सरकारचा विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती त्यांनी शोधून काढल्या.

     सन 1985 मध्ये नरेंद्र मोदी हे आरएसएस द्वारे भारतीय जनता पार्टी मध्ये सामील झाले. Narendra Modi एक कुशल नेता होते. बीजेपी मध्ये त्यांच्या प्रवेशामुळे पार्टी ने जोरदार वाढ मिळवली.

     1987 मध्ये त्यांनी पहिल्यांदा अहमदाबाद नगर पालिकेची निवडणूक लढवली. व यात विजय पण मिळवली.

     पार्टीच्या अनेक कार्यामध्ये मदत केल्याने त्यांचे नाव खूप वाढत गेले. सन 1995 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने 121 सीट मिळवले. ज्यामुळे गुजरात मध्ये पहिल्यांदा भाजपा ची सरकार बनली. परंतु भाजपा सरकार काही काळच सत्तेत राहिली व सप्टेंबेर 1996 मध्ये त्यांची सरकार समाप्त झाली.

     नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 2001 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली व राजकोट मध्ये 2 मधून एक जागा जिंकली ज्यामुळे ते गुजरात चे मुख्यमंत्री बनून गेले. 7 ऑक्टोबर 2001 मध्ये त्यांनी पहिल्यांदा गुजरात चे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व या नंतर एकानंतर एक असे 3 वेळ ते गुजरात चे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.11.2022-सोमवार.