माझिया प्रियाला प्रीत कळेना!!!

Started by Jai dait, August 12, 2010, 02:30:55 PM

Previous topic - Next topic

urmila sagare


तू काही न बोलता
मला सारे उमगते;
तुला कसे रे भेद हे
मनात ठेवणे साधते;
गीत आपुले एक तरीही, सूर का जुळेना
माझिया प्रियाला प्रीत कळेना!!!

मला कळू दे का हा दुरावा,
का हा अबोला, दूर न व्हावा
याच विचारी दिवस जाई, सांज का ढळेना
माझिया प्रियाला प्रीत कळेना!!!

दोघांत काही नाही, तरीही
ओढ कशाला एकमेकांची
मजला वाटे, काय तुला ते, सांगता येईना
माझिया प्रियाला प्रीत कळेना!!!


--जय
:) :) :) :)