मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-40-माझे आवडते फूल गुलाब

Started by Atul Kaviraje, November 22, 2022, 09:11:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-40
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझे आवडते फूल गुलाब"

     आपल्या सभोवताली बागेत अनेक वेगवेगळे फूल फुललेले असतात, फुलांची सुंदरता मनाला मोहून घेते. काही फूल दिसण्यात सुंदर असतात तर काहींचा सुगंध मोहक असतो.

     आजच्या या लेखात आपण माझे आवडते फूल गुलाब किंवा गुलाब मराठी निबंध पाहणार आहोत.

     आपल्या देशात वेगवेगळ्या जातीची सुंदर फुले पाहायला मिळतात. परंतु या सर्वांमध्ये माझे आवडते फुल गुलाबाचे आहे. गुलाब फुल हे दिसण्यात सुंदर रंगाचे आणि सुगंधित असते. गुलाबाचा सुगंध मनाला मोहून घेतो. गुलाब फुलाच्या कडीला काटे लागलेले असतात. पण तरीही सर्वच लोकांद्वारे गुलाब पसंद केले जाते. गुलाबाच्या पाकळ्या अतिशय कोमल असतात.

     जगभरात गुलाबाच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. गुलाबच्या रंगानुसार त्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरे, लाल, काळे, गुलाबी अश्या विविध रंगांमध्ये आणि विविध प्रदेशात गुलाब आढळतात. यापैकी पांढरे गुलाब हे पृथ्वीच्या उत्तर भागात सापडते. लाल गुलाब दिसण्यात सुंदर व सुगंधित असते हे फूल सर्वच देशांमध्ये आढळते. काळे गुलाब पूर्णपणे काळे नसते, ते हलक्‍या काळ्या रंगात आढळते हे गुलाब जास्त करून तुर्की देशात सापडते. गुलाबी गुलाब हे लाल गुलाबाप्रमाणेच दिसण्यात सुंदर व सुगंधित असते याचा उपयोग सुगंधित परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो.

     गुलाबाचे फुल जेव्हा फुलते तेव्हा त्याच्या आजूबाजूला भुंगे आणि फुलपाखरे उडू लागतात. गुलाबाचा उपयोग भरपूर कार्यांसाठी केला जातो. पूजेत देवाला अर्पण करण्यासाठी गुलाब वापरले जाते. घरात व इतर ठिकाणी सजावटीसाठी गुलाबाचा उपयोग केला जातो. दक्षिणेकडील भागात गुलाबाची शेती केली जाते ज्यामुळे अनेक आर्थिक लाभ होतात. काही स्त्रिया सुंदरता वाढवण्यासाठी केसांमध्ये गुलाब लावतात. गुलाब पासून गुलाब जल, गुलकंद, अत्तर, शरबत, तेल इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. याशिवाय काही आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी देखील गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग केला जातो. गुलाबाचे फुल औषधी प्रमाणे कार्य करते, यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. दररोज गुलाब खाल्ल्याने टीबी चा रोग चांगला होतो. याशिवाय गुलाब सुंदरतेत देखील वृद्धी करतो.

     जगभरात 22 सप्टेंबरला तर भारतात 7 फेब्रुवारीला रोज डे म्हणजेच 'गुलाब दिवस' साजरा केला जातो. आपल्या देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आपल्या जॅकेट मध्ये गुलाबाचे फुल लावत असत. असे म्हटले जाते की पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडत असत. भारतात गुलाबाच्या फुलाला फुलांचा राजा म्हटले जाते. अनेक सत्कार समारंभात गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले जाते. गुलाब सुंदर फुल असण्यासोबतच सुंगांधीत फुलही आहे, इत्यादी अनेक कारणांनी मला गुलाबाचे पुष्प आवडते व माझे आवडते फुल पुष्प गुलाब आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.11.2022-मंगळवार.