मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-15-क्लोंडायक गोल्ड रश - भाग १-ब

Started by Atul Kaviraje, November 22, 2022, 09:21:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-15
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "क्लोंडायक गोल्ड रश - भाग १"

                             क्लोंडायक गोल्ड रश - भाग १--ब--
                            ------------------------------

     Seward च्या दृष्टीने त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात केलेला हा सर्वोत्तम सौदा होता. पण त्याचवेळी त्याला हेही ठावूक होत या सौद्याचं महत्त्व सामान्य जनतेला पटण्यासाठी बराच काळ जाणं आवश्यक आहे आणि झालंही तसंच. सामान्य अमेरिकन जनतेने या कराराची यथेच्छ खिल्ली उडवली. 'Seward's Folly', 'Seward's Icebox, 'polar bear garden' असं या सौद्याच नामकरण केलं गेलं. अलास्का हा एक तर मूळ अमेरिकन भूमीपासून थोडा दूरच, त्यातून वर्षभर बर्फाने आच्छादलेला नव्हे हिमनगांनी भरलेला प्रदेश.

     बहुसंख्य अमेरिकन जनता कुचेष्टेने या व्यवहारबद्द्ल 'Seven million, two hundred thousand dollars for an inaccessible region of icebergs - the heights of stupidity.' म्हणत असे.

     त्यातच पुढे १८९३ साली आलेल्या मंदीमुळे सामान्य अमेरिकन जनता अक्षरशः होरपळून निघाली. या 'Panic of 1893' काळात अमेरिकेत जवळजवळ १५००० उद्योग बंद पडले. सामान्य माणसाला काम मिळणं दुरापास्त होऊ लागलं. निराशेच्या गर्तेत सापडलेला सामान्य माणूस लवकरात लवकर या संकटातून बाहेर पाडण्यासाठी मार्ग शोधू लागला. १८४९ साली कॅलिफोर्नियातील गोल्ड रशने अनेकांना झटपट श्रीमंत केलं होतं. अमेरिकेला यावेळी ही अशाच काहीश्या चमत्काराची गरज होती. याच आशेवर अनेकांनी अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील राज्यात सोनं शोधण्यास सुरुवात केली. त्यातच एक दिवस प्रोस्पेकटर्स Joe Juneau व Richard Harris यांना अलास्काच्या नैऋत्य किनारर्‍यावर सोनं सापडल्याची बातमी अमेरीकेत थडकली आणि सोनं मिळण्याच्या आशेवर सॅनफ्रान्सिस्को व सिअ‍ॅटलच्या बंदारवर जहाजं भरून माणसं उतरू लागली.

     आजवर Seward's Folly या नावाने अवहेलना केला गेलेला हाच अलास्काचा भूभाग एका नाटयमय कहाणीचा साक्षीदार होणार होता.

कहाणी होती मानवी इर्ष्येची, दुर्दम्य इच्छाशक्तीची, शौर्य आणि असामान्य धाडसाची,
कहाणी असामान्य कष्टाची, मानवी स्वप्नांची, आशा आणि निराशेची, घोर अपेक्षाभंगाची....
कहाणी एका देशाचा भूगोल आणि इतिहास बदलणारी,
कहाणी सुरु होणार होती 'क्लोंडायक गोल्ड रश' ची ....

--हेमांगी के
(May 9, 2013)
----------------

(क्रमश:)--
--------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.11.2022-मंगळवार.