मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-41-माझे आवडते कार्टून-doreamon

Started by Atul Kaviraje, November 23, 2022, 09:15:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-41
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझे आवडते कार्टून-doreamon"

     आज आपण माझे आवडते कार्टून या विषयावर निबंध पाहणार आहोत. या निबंधात डोरेमोन बद्दल माहिती देण्यात आली आहे.

     मी लहानपणापासून कार्टून पाहत आहे. टीव्ही वर वेगवेगळ्या चॅनल वर वेगवेगळे कार्टून कार्यक्रम लागतात. परंतु माझे आवडते कार्टून डोरेमोन आहे. मला डोरेमोन पाहायला खूपच आवडते. डोरेमोन कार्टून माझे आवडते कार्टून आहे. जर कधी लाईट गेलेली असली तर मी मोबाईल वर डोरेमोन पाहतो. मला डोरेमोन चा आवाज खूप आवडतो. माझ्या मित्रांना पण डोरेमॉन बघायला आवडते. हे कार्टून कॉमेडी असण्यासोबताच चांगली शिकवण पण देते.

     मी टीव्ही वर डोरेमोन व्यतिरिक्त इतर कोणतेच कार्यक्रम पाहत नाही. माझ्यासोबत आमचे शेजारी मुलेही डोरेमोन कार्टून पाहतात. आज भारतात डोरेमोन कार्टून पाहणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कारण डोरेमोन पाहून सर्वच मुलांना हसू येते. मनोरंजनासोबतच आंतरिक आनंदाची प्राप्ती होते.

     जेव्हा मला मित्रांसोबत रिकामा वेळ मिळतो तेव्हा आम्ही डोरेमॉन कार्टून च्या गप्पा करतो. डोरेमोन कार्टून ला हिंदी भाषेशिवाय इतर भारतीय भाषांमध्येही बनवण्यात आले आहे. मी वाचले आहे की डोरेमॉन कार्टून ला हिरोशी फुजिमोटो आणि मोटू अबिको या जपानी कार्टूनीस्ट ने तयार केले आहे. त्यांनी जपान च्या मंगा सीरिज साठी डोरेमॉन चे कार्टून बनवणे सुरु केले, त्यांनी ज्या पेन ने हे कार्टून तयार केले त्या पेनाला फुजिको फुजी नाव देण्यात आले.

     डोरेमोन कार्टून मध्ये डोरेमॉन एक रोबो मांजर असतो, जो बाविसाव्या शतकामधून नोबिता नावाच्या मुलाला मदत करायला आलेला असतो. नोबिता अभ्यास व दुसऱ्या गोष्टीमध्ये इतर मुलांपेक्षा मागे असतो. डोरेमॉन नोबिताला बाविसाव्या शतकातील प्रगत गॅजेट्स देऊन मदत करतो. डोरेमॉन कार्टून मधून मनोरंजनासोबत अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पण मी जेव्हाही टीव्ही लाऊन डोरेमॉन पाहतो तेव्हा माझी आई माझ्यावर रागावयाला लागते, माझी आई म्हणते की डोरेमॉन पाहिल्याने काहीही होणार नाही वेळ वाया करण्यापेक्षा अभ्यास कर तरच तुला यश मिळेल. पण तरीही डोरेमॉन माझे आवडते कार्टून आहे व मी वेळ काढून दिवसातून एकदा डोरेमॉन नक्कीच पाहतो.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.11.2022-बुधवार.