दिव्यातला राक्षस ....

Started by Vkulkarni, August 16, 2010, 02:58:27 PM

Previous topic - Next topic

Vkulkarni

समुद्रकिनारी फिरताना,
जुना गंजला दिवा मिळाला
हलकेच घासता दिव्यामधुनी
राक्षसकी हो निघाला
हा हा हा हा ....
विकट हास्य करुन म्हणाला
बोल मेरे आका,
कहा करु तेरा तबादला
तबादला तर कधीच झाला
शोधतो नव्या शहरात दलाला
घर शोधणे झाले मुश्किल
बाबा रे, आता तुझाच हवाला
विषण्ण हसला, हळुच म्हणाला
मालको, जुना जमाना गेला
असते जर सोपे शोधणे
आजकाल प्रामाणिक दलाला
गुलाम तुझा हा असा
असता का गंजल्या दिव्यात राहीला
खारघर, कल्याण नाहीतर
गेलाबाजार एखादा कर्जतला
वन बी एच के नसता का पाहिला.

विशाल

santoshi.world




Vkulkarni


aspradhan

सगळ्यांचीच व्यथा आहे! फक्त मुंबईलाच नाही , प्रोब्लेम इतर शहरातही आहे!

nalini

असते जर सोपे शोधणे
आजकाल प्रामाणिक दलाला
गुलाम तुझा हा असा
असता का गंजल्या दिव्यात राहीला
खारघर, कल्याण नाहीतर
गेलाबाजार एखादा कर्जतला
वन बी एच के नसता का पाहिला.

apratim ....