३०-नोव्हेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, November 30, 2022, 08:52:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.११.२०२२-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "३०-नोव्हेंबर-दिनविशेष"
                                 ----------------------

-: दिनविशेष :-
३० नोव्हेंबर
विजयी झाल्यावर दोन बोटांनी 'V' दाखवण्याची पद्धत इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी सर्वप्रथम लोकप्रिय केली. दुसर्‍या महायुद्धाची घोषणा झाल्यानंतर विन्स्टन चर्चिल यांनी संसदेत ऐतिहासिक भाषण केले. त्यात इंग्लंडचे अंतिम ध्येय फक्त विजय असेल हे सांगताना त्यांनी आवेशात दोन बोटे उंचावून 'V' हे विजयचिन्ह दर्शविले.
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०००
पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन 'एन्डेव्हर' या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
१९९६
ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान. हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार आहे.
१९९५
'ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म' संपल्याची अधिकृत घोषणा
१९६६
बार्बाडोसला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९१७
कलकत्ता येथे 'आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युट'ची स्थापना
१८७२
हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६७
राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता
(मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१०
१९४५
वाणी जयराम
वाणी जयराम – पार्श्वगायिका
१९३५
आनंद यादव
आनंद यादव – लेखक
(मृत्यू: २७ नोव्हेंबर २०१६ - पुणे)
१९१०
कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ 'बाकीबाब' – कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार
(मृत्यू: ९ जुलै १९८४)
१८७४
विन्स्टन चर्चिल – दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: २४ जानेवारी १९६५)
१८५८
जगदीशचंद्र बोस
१९३० मधील छायाचित्र
जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन
(मृत्यू: २३ नोव्हेंबर १९३७)
१८३५
मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार
(मृत्यू: २१ एप्रिल १९१०)
१७६१
स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी ऑस्मिअम व इरिडिअम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट (Cu12As4S13) असे नाव दिले आहे.
(मृत्यू: २२ फेब्रुवारी १८१५)
१६०२
ऑटो व्हॉन गॅरिक – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: २१ मे १६८६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१२
इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान
(जन्म: ४ डिसेंबर १९१९)
२०१०
राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता
(जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)
१९९५
वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: १६ जुलै १९१४)
१९७०
निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर
(जन्म: १४ जानेवारी १८८३)
१९००
ऑस्कर वाईल्ड
ऑस्कर वाईल्ड – आयरिश कवी व नाटककार, 'कलेसाठी कला' या मताचे कट्टर पुरस्कर्ते. त्यांच्या नाटकांची मराठीतही रुपांतरे होऊन ती रंगभूमीवरही आली आहेत. वि. वा. शिरवाडकरकृत 'दूरचे दिवे' हे नाटक 'अ‍ॅन आयडियल हजबंड'चे रुपांतर आहे. १९६३ मध्ये त्यांचे साहित्य 'द वर्क्स ऑफ ऑस्कर वाइल्ड' या नावाने संकलित झाले आहे.
(जन्म: १६ आक्टोबर १८५४)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.11.2022-बुधवार.