मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-50-माझा आवडता प्राणी कुत्रा

Started by Atul Kaviraje, December 02, 2022, 09:09:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला निबंध"
                                      निबंध क्रमांक-50
                                 ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता प्राणी कुत्रा"

     तसे पाहता लोक अनेक पाळीव प्राणी पाळतात पण सर्वांमध्ये कुत्रा हा अतिशय समजदार आणि वफादार प्राणी असतो. कुत्रा हाच माणसाचा खरा मित्र असतो. कारण   कुत्रा हा एकमेव प्राणी माणसाप्रमाणे विचार करून त्याच्या भावना समजू शकतो. म्हणूनच कुत्रा जर मलकापासून दूर झाला तर तो दुःख व्यक्त करतो.

     एका कुत्र्याच्या तोंडामध्ये 42 दात असतात. कुत्र्याची सूंघण्याची क्षमता प्रचंड असते, म्हणूनच पोलिस लोक सुद्धा केस सोडवण्यासाठी कुत्र्यांना वापरतात. कुत्र्याच्या मदतीने चोर पकडणे, विस्फोटक वस्तू बॉम्ब ई. माहिती काढणे सोपे होते. वेगवेगळ्या देशात कुत्र्यांच्या वेगेगळया प्रजाती पाहायला मिळतील. कुत्र्याचे आयुष्य 15-20 वर्षाचे असते. कुत्रा जेवणात मास, फळ, भाज्या, दूध, बिस्कीट ई. सर्व खातो. कुत्रा झोपेत सुद्धा खूप सतर्क असतो, छोट्याश्या आवाजाने सुद्धा त्याला लगेच जाग येते. म्हणूनच ज्या घरात कुत्रा पाळला जातो तेथे चोरांचे येणे कठीण असते.

     कुत्रा त्याच्या भावना भुंकुन किंवा शेपटी हलवून व्यक्त करतो. कुत्रीच्या मुलांना पिल्ले म्हटले जाते. कुत्रा हा असा प्राणी आहे जो सर्व प्रकारच्या वातावरणात राहू शकतो. बाहेरील वातावरणाच्या हिशोबाने तो स्वतः मध्ये बदलाव करत असतो. मनुष्याचा तुलनेने कुत्र्याचे शरीर जास्त गरम असते पण तरीही त्याला कधीच घाम येत नाही.

     कुत्रा हा खरोखरच समजदार व खूपच वफादार प्राणी आहे. आम्ही सुद्धा आमच्या घरी टॉम्मी नावाचा एक कुत्रा पाळला आहे. मला कुत्रे खूप आवडतात व कुत्रा माझा आवडता प्राणी आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.12.2022-शुक्रवार.