मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-51-माझा आवडता प्राणी सिंह

Started by Atul Kaviraje, December 03, 2022, 09:57:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-51
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता प्राणी सिंह"

     मित्रानो आपल्या देशात खूप सारे प्राण्यांच्या जाती पाहायला मिळतात. , त्यात सिंहाला जंगलाचा राजा म्हटले गेले आहे. आजच्या या लेखात मी तुम्हाला माझा आवडता प्राणी सिंह या विषयावर निबंध मराठीत देत आहे. हा निबंध तुम्ही आपला शाळेचा होमवर्क म्हणून देखील वापरू शकता, तर करा सुरुवात..

     आपल्या देशात वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या जाती पाहायला मिळतात. काही प्राणी हिंस्त्र असतात तर काही पाळीव असतात. पण सिंहाला जंगलाचा राजा म्हटले गेले आहे. सिंह एवढा शक्तिशाली असतो की खूप असानी ने तो त्याच्या पेक्षा मोठ्या प्राण्यांची शिकार करून टाकतो. सिंह हा हरण, जिराफ, जंगली म्हशी, हत्ती या सारख्या मोठमोठ्या प्राण्यांची शिकार सुद्धा करतो.

     सिंह मासाहIरी असतो आणि शाकाहारी प्राण्यांना खाऊन तो आपली भुख भागवतो. सिंह जास्त करून रात्रीच्या वेळी शिकार करतो, रात्री शिकार करण्याचा फायदा असा असतो की रात्री अंधाऱ्या मुळे सिंह हा इतर प्राण्यांना व्यवस्थित दिसत नाही आणि ज्यामुळे काही क्षणातच सिंह त्याचा शिकाराला ठार करतो. जास्त करून शिकार सिहिणी द्वारा केले जातात. सिंह आपल्या क्षेत्रात दुसऱ्या सिंहांना येऊ देत नाही, बऱ्याचदा क्षेत्र वरून त्यांच्यात युद्ध आणि वाद विवाद देखील होतात. एका वयस्क सिंहाची लांबी 3.5 फूट असते आणि उंची 10 फूट पर्यंत असते. सिहाचे वजन 120 किलो पर्यंत असते. त्याच्या जबड्यात 30 दात असतात. सिंहाची दात खूप मजबूत असतात आणि हेच दात त्याच्या शिकारला ठार करण्यासाठी उपयोगी पडतात. सिंह 40-80 किलोमीटर प्रती तास च्या वेगाने धावू शकतो. सिंहाची डरकाळी 8 किलोमीटर दुरूनही ऐकू येते.

     आज जंगलाचा राजा असताना देखील सिंहाची संख्या लगातार कमी होत आहे. याचे मुख्य कारण सिंहाची वाढती शिकार व जंगलांची तोड आहे. भारतात सिंहाची प्रजात विलुप्तीच्या मार्गावर आहे. पण वर्ष 2010 पासून आता ही संख्या वाढत आहे सरकार व वनविभाग या कडे विशेष लक्ष देत आहे. जी एक चांगली बाब आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.12.2022-शनिवार.