मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-52-माझा आवडता प्राणी सिंह

Started by Atul Kaviraje, December 04, 2022, 09:24:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-52
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता प्राणी सिंह"

     जगभरात वेगवेगळे प्राणी आणि प्राण्यांच्या जाती आढळतात. परंतु सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. त्याला इंग्रजीत लायन असे म्हणतात. सिंह हा दिसण्यात खूपच हिंसक आणि भयानक असतो सिंह च्या एका डरकाळी ने संपूर्ण जंगल घाबरायला लागते. यामुळेच सिंहाला प्राण्यांचा राजा म्हटले जाते. सिंह खूपच बहादुर व शूरवीर प्राणी आहे या मुळेच मला सिंह हा खूप आवडतो व माझा आवडता प्राणी सिंह आहे.

     सिंहाचे वैज्ञानिक नाव पँन्थेरा लिओ असे आहे. सिंह मांसाहारी असतो, तो जंगलातील कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकतो. म्हणून त्याला जंगलाचा व सर्व प्राण्याचा राजा म्हटले जाते. सिंहाचे शरीर मजबूत असते. तो 80 किलोमीटर प्रतितास या वेगाने पळू शकतो. सिंहाची डरकाळी 6 ते 7 किलोमीटर दूरनही एकायला येते. त्याच्या मानेवर मुलायम केस असतात या केसांना आयाळ म्हणतात. सिंहाच्या तोंडात 32 दात असतात हे दात मानवी बोटा पेक्षा मोठे असतात. त्याचे दात तेज व धारदार असतात, या दातांच्या मदतीने तो आपल्या शिकाराला घट्ट पकडून ठेवतो. सिंहाच्या तुलनेत सिंहीण जास्त शिकार करते.

     एका वयस्क सिंहाची उंची साडेतीन फूट पर्यंत असते. त्याचे वजन 190 किलो पर्यंत असू शकते. सिंह हा सरासरी वीस वर्षांपर्यंत जगतो. परंतु प्राणिसंग्रहालयात असणारे सिंह आठ ते दहा वर्षे जगतात. सिंहाला पाळणे, बंदी बनवून ठेवणे किंवा शिकार करणे भारतात गैरकानूनी आहे. जर कोणी सिंहाची शिकार करीत असेल तर त्याला दंड व तुरुंगातील शिक्षेचा नियम आहे.

     जंगलाचा राजा असताना देखील सिंहाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे जंगलतोड व शिकारी द्वारे होत असलेली बेकायदेशीर शिकार. परंतु सरकार चे नियम व वन्य जीव संरक्षण योजनेमुळे आता भारतात सिंहाची संख्या वाढत आहे. 2010 साली भारतातील एकूण सिंहांची संख्या 411 होती तर 2015 मध्ये ही संख्या वाढून 523 होऊन गेली. सिंह हा पृथ्वीवरील सर्वात महत्वपूर्ण प्राण्यांपैकी एक आहे म्हणून त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायला हवी.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.12.2022-रविवार.