क्षणभंगुर कवित्व....

Started by pankh09, August 18, 2010, 03:46:40 AM

Previous topic - Next topic

pankh09


अगदी आठवतय तेव्हा पासून...
माझ्या क्षणभंगुर कवित्वाला...
निरर्थकपणे जपण्याचा....
केविलवाणा..लाजिरवाणा...
प्रयत्न करत आलो आहे...

कधी आनंद तर कधी दुःख..
कधी प्रेमांकुर तर कधी प्रेमभंग...
भावनांच्या ह्या जत्रेत मी..
शब्दांचा पोरखेळ चालवलेला आहे...

न रस माहित कुठला...न अलंकार साजे कधी...
वाचुनिया पर कविता..क्षणिक उत्साह दाटे मनी...

यमकांची असते चालू... ती कसरत तारेवरची...
उणीव जाणवू लागते मग..शब्दांवरील प्रभुत्वाची...

आशाळभूत मन माझे पुन्हा ...वाट पाही अभिप्रायाची...
एकटा नाही इथे मी...आहे कथा ही सर्वांची...


-पंकज
स्वरचित.....

amoul

its very true !!! वेगळे  काहीच  सांगू  शकत  नाही !!


rudra


santoshi.world

apratim ............ khup khup avadali ......  agadi mazya manatale mandalyasarkhe vatale ......... :)