मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-54-माझा आवडता प्राणी बैल

Started by Atul Kaviraje, December 06, 2022, 09:02:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-54
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता प्राणी बैल"

     बैल हा मनुष्याचा व खास करून शेतकऱ्याचा मित्र असतो. बैल हा एक पाळीव प्राणी आहे व याचा उपयोग जास्त करून एका जागेवरून दुसऱ्या जागी सामान वाहण्यासाठी केला जातो. बैलगाडी भारतात सर्व ठिकाणी पाहायला मिळते. खास करून खेडे गाव व लहान शहरामध्ये बैलगाडीचा स्वस्त वाहन म्हणून वापर होतो.

     तंत्रज्ञानाच्या विकासानंतरही बैलगाडी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जत्रे मध्ये समान वाहणारे लोक आजही बैलगाडीचा उपयोग करतात.

     शेतकऱ्यांसाठी तर बैल अत्यंत उपयुक्त प्राणी आहे. शेतकरी बैलाच्या मदतीने त्यांचे शेत नांगरतात. म्हणूनच शेतीसाठी बैल हा अती उपयुक्त प्राणी आहे. याशिवाय धान्य वेगळे करणे, सिंचन व दळणे इत्यादी कार्यातही बैलाचा उपयोग केला जातो. बैल द्वारे शेतीच्या कार्यात दिलेले योगदान लक्षात घेऊन त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते.

     अन्य प्राण्यांच्या तुलनेत बैल अत्याधिक वजन धरू शकतो. बैल घोड्याच्या तुलनेत हळू चालतो. परंतु तो घोड्यापेक्षा अधिक परिश्रम करतो. बैल त्याच्या मालकाला खूप प्रेम करतो. तो कधीही त्याच्या मालकाला विसरत नाही व वेळप्रसंगी स्वतःचे प्राण संकटात टाकून मालकाचा जीव वाचवतो.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.12.2022-मंगळवार.