इलेकशन

Started by gurudatt99, December 06, 2022, 11:42:16 PM

Previous topic - Next topic

gurudatt99

इलेकशन......

इलेकशन च्या रणधुमाळीत, विसरले सगळे दुष्काळ
पीक नाही, पाणी नाही कधी येईल सुकाळ

शेतकरी राजा म्हणून, पक्षांनी घेतल्या भेटी-गाठी
म्हणे निवडून द्या आमासनी, बांधू आम्ही धरणं मोठी

हात म्हणे आम्ही केलं,  घड्याळ म्हणे आम्ही केलं
पण, आमच्या शेतीला तर जलयुक्त शिवारनंच तारलं

आम्ही तुमच्या नादी लागून काढल्या आक्रोश यात्रा
पण, शेतकऱ्यांसाठी योजनांच्या भरल्या हूत्या जत्रा

आता कसलं बी आमिष दाकवा, आमचं मत ठरलंय
फिर एक बार मोदीच सरकारच येऊन ठाकलय

@ गुरुदत्त पोतदार