संदीप खरे, सलील कुलकर्णी-मी पप्पाचा ढापून फोन,फोन केले एकशे दोन !

Started by Atul Kaviraje, December 08, 2022, 09:37:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्री संदीप खरे, सलील कुलकर्णी यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "मी पप्पाचा ढापून फोन,फोन केले एकशे दोन !"

                       "मी पप्पाचा ढापून फोन,फोन केले एकशे दोन !"
                       ------------------------------------------

मी पप्पाचा ढापून फोन,फोन केले एकशे दोन !
हॅलो हॅलो बोलतय कोणं ? हॅलो हॅलो बोलतय कोणं?
हॅल्लो बोलतंय कोण ??
ए हॅलो...!!

आमचे नाव घेलाशेट, डोंगरा‌एवढे आमचे पेट
विकत बशतो शाजूक तूप, शाला चापून खातो आम्हीच खूप...
तुम्ही कोण काय तुमचं नाव,बोला झटपट तुमचा गाव..!!
कसलं नाव, नि कसला गाव...राँग नंबर लागला राव..!

लक्षुमबा‌ई मी जोश्याघरची, चोरून खाते अंडा-बुर्जी
वरती कपभर दूध अन्‌ साय,घरात आत्ता कोनी न्हाय...
तुम्ही कोण काय तुमचं नाव,बोला झटपट तुमचा गाव..!!
कसलं नाव, नि कसला गाव...राँग नंबर लागला राव..!

आमचे नाव आई-पप्पाय , चोळत बसतो दुखरा पाय
पालक खाईन गड्या चार , नंतर देईन खरपूस मार
तुम्ही कोण काय तुमचं नाव,सांगा झटपट सांगा राव..!!
कसलं नाव, नि कसला गाव...राँग नंबर लागला राव..!

मी तर आहे अट्टल चोर , चंद्राची मी चोरून कोर
झालो आता रात्र पसार , तारे उरले फक्‍त हजार
तुम्ही कोण काय तुमचं नाव,बोला झटपट तुमचा गाव..!!
कसलं नाव, नि कसला गाव...राँग नंबर लागला राव..!

हॅलो...
ढगामधून बोलतोय बाप्पा...चल,चल मारू थोड्या गप्पा...
बाप्पा बोलतोयस तर मग थांब,सगळ्यात आधी येवढं सांग
कालंच होता सांगत पप्पा,तिकडे आलेत आमचे अप्पा...
एकतर त्यांना धाडून दे, नाहीतर फोन जोडून दे...
तुला सांगतो अगदी स्पष्ट... अर्धीच राहिलीये आमची गोष्ट....
त्यांना म्हणावं ये‌ऊन जा... गोष्ट पुरी करुन जा
म्हणले होते ने‌ईन भूर्रर्र,एकटेच गेलेत केवढे दूर
डिटेल सगळा सांगतो पत्ता,तिकडे पाठव आमचे अप्पा
बाप्पा,बाप्पा बोला राव,सांगतो माझं नाव अन्‌ गाव....

कसलं नाव, नि कसला गाव...राँग नंबर लागला राव..!

================
स्वर- संदीप खरे,सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
================

--प्रकाशक : शंतनू देव
(MONDAY, MARCH 21, 2011)
--------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                             (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
                -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2022-गुरुवार.