०९-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 09, 2022, 08:48:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०९.१२.२०२२-शुक्रवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "०९-डिसेंबर-दिनविशेष"
                                  ----------------------

-: दिनविशेष :-
०९ डिसेंबर
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९५
बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ
१९७१
संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६६
बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६१
टांझानियाचा ध्वज
ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म
१९००
लॉन टेनिसमधील 'डेव्हिस कप' स्पर्धांना सुरुवात झाली.
१७५३
थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४६
सोनिया गांधी
सोनिया गांधी – जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी
१९४६
शत्रुघ्न सिन्हा
शत्रुघ्न सिन्हा – चित्रपट अभिनेते व राजकारणी, राज्यसभा खासदार (१९९६ - २००८), केंद्रीय नौकानयन मंत्री, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री, १५ व्या व १६ व्या लोकसभेतील खासदार (पाटणा साहिब)
१८७८
अण्णासाहेब लठ्ठे
अण्णासाहेब बाबाजी लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री, मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री, रावबहादूर (१९२४), दिवाणबहादूर (१९३०) व करवीररत्न (१९४७) या पुरस्कारांनी गौरवान्वित
(मृत्यू: १६ मे १९५० - बेळगावी, कर्नाटक)
१८६८
फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
(मृत्यू: २९ जानेवारी १९३४ - बाझेल, स्वित्झर्लंड)
१६०८
जॉन मिल्टन – कवी, विद्वान व मुत्सद्दी
(मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९७
के. शिवराम कारंथ
२००३ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते, विचारवंत आणि व्यासंगी विद्वान. त्यांना साहित्य अकादमी पारितोषिक (१९५९), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (१९७३), ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८), साहित्य अकादमी फेलोशिप (१९८५), पद्मभूषण इ. सन्मानांनी गौरविण्यात आले होते. इंदिरा गांधी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ त्यांनी आपला पद्मभूषण पुरस्कार परत केला होता.
(जन्म: १० आक्टोबर १९०२ - कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)
१९४२
डॉ. द्वारकानाथ कोटणीस
१९९३ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक
(जन्म: १० आक्टोबर १९१०)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.12.2022-शुक्रवार.