१०-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 10, 2022, 09:01:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.१२.२०२२-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "१०-डिसेंबर-दिनविशेष"
                                  ----------------------

-: दिनविशेष :-
१० डिसेंबर
जागतिक मानवी हक्क दिवस
Human Rights Day
अल्फ्रेड नोबेल दिवस
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०१४
कैलाश सत्यर्थी आणि मलाला युसुफझाई
भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००८
अमर्त्य सेन
प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.
१९७८
मेनाकेम बेगिन आणि अध्यक्ष अन्वर सादात
८ जानेवारी १९८०
ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९१६
'संगीत स्वयंवर' या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९०६
थिओडोर रुझवेल्ट
The Nobel Foundation
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
१९०१
नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
१८६८
पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१८९२
बापूराव पेंढारकर
व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक
(मृत्यू: १५ मार्च १९३७)
१८८०
डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.
(मृत्यू: ८ जानेवारी १९६७ - पुणे)
१८७८
चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक
(मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)
१८७०
सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार
(मृत्यू: १९ मे १९५८)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१४
चंद्रकांत खोत
चंद्रकांत खोत – लेखक, कवी आणि संपादक. अतिशय मनस्वी आणि तरीही अलिप्त असे साहित्यिक म्हणून खोत यांची ओळख होती. विवेकानंद यांच्या आयुष्यावरची 'बिंब-प्रतिबिंब' ही त्यांची गाजलेली कादंबरी होती. तसंच रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या नात्यावरची 'दोन डोळे शेजारी' ही त्यांची कादंबरीही खूप गाजली.
 'अबकडई' या दिवाळी अंकाचं संपादनही त्यांनी केलं होतं. खोत यांनी धाडसी लिखाणही केलं होतं. मुंबईतल्या पुरूष वेश्यांच्या जीवनावरची 'उभयान्वयी अव्यय' ही त्यांची कादंबरी बरीच गाजली.
(जन्म: १७ सप्टेंबर १९४० - भीमाशंकर)
२००९
दिलीप पुरुषोत्तम चित्रे
दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार
(जन्म: १७ सप्टेंबर १९३८)
२००३
श्रीकांत ठाकरे – संगीतकार
(जन्म: ? ? ????)
२००१
अशोक कुमार
अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या
(जन्म: १३ ऑक्टोबर १९११)
१९६४
शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार
(जन्म: १७ ऑगस्ट १९०५)
१९६३
सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्‍कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित
(जन्म: ३ जून १८९५)
१९५५
आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक
(जन्म: २६ सप्टेंबर १८९४)
१९२०
होरॅस डॉज – 'डॉज मोटर कंपनी'चे एक संस्थापक
(जन्म: १७ मे १८६८)
१८९६
अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
(जन्म: २१ आक्टॊबर १८३३)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.12.2022-शनिवार.