मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-38-एथिक्स म्हणजे काय रे भाऊ ?

Started by Atul Kaviraje, December 15, 2022, 09:12:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-38
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "एथिक्स म्हणजे काय रे भाऊ ?"

                                एथिक्स म्हणजे काय रे भाऊ ?--
                               ---------------------------

     एथिक्स म्हणजे काय रे भाऊ? हा प्रश्न विचारावासा वाटला कारण नानवटी यांच्या तंत्रज्ञान विषयीच्या धाग्यात या बाबत काही चर्चा झाली व अनेक वर्षापूर्वी मसूरी येथे लाल बहादूर शास्त्री National Academy of Administration येथे Foundations of Administration या अभ्यासक्रमात झालेल्या काही चर्चेची व त्या नंतर सरकारी नोकरीत असताना उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांची आठवण झाली.

     अभ्यासक्रमात प्रख्यात जल अभियंता मोक्शगुण्डम विश्वेशवरैय्या यांची एक आठवण होती. विश्वेशवरैय्या यांची कमालीचे प्रामाणिक व एथिकल अशी ख्याती होती. विश्वेशवरैय्या यांना धरण कालवे इत्यादी planning करता अनेकदा site वर रहावे लागत असे. डाक बंगल्यात सन्ध्याकाळी पण उशीरा पर्यंत चर्चा चालत असे. त्या काळी वीज नसे व मेणबत्तीच्या प्रकाशात सर्व कामे होत असत. जेवणाची वेळ झाली कि विश्वेशवरैय्या सरकारी पैश्यानी घेतलेल्या मेणबत्या विझवून आपल्या पैश्यानी घेतलेल्या मेणबत्या लावीत असत. कारण त्यांच्या दृष्टीने जेवण ही खाजगी बाब होती व त्या करता सरकारी मेणबत्या वापरणे unethical होते. जेवण झाल्यावर जर सहकार्यांबरोबर अजून चर्चा बाकी असेल तर परत खाजगी मेणबत्या विझवून सरकारी मेणबत्या लावीत व त्या नंतर झोपण्या आधी काही पुस्तक वगैरे वाचण्या करता परत सरकारी मेणबत्या विझवून खाजगी मेणबत्या लावीत.

     मला काही हे पटले नाही. व जरा sarcastic स्वभाव असल्याने मी विचारले कि खाजगी मेणबत्या लावण्या करता खाजगी काडेपेटी असे का सरकारी काडेपेटीतील काडी वापरून खाजगी मेणबत्या लावीत? या वर वर्गात बराच गदारोळ झाला. पण नंतर
"ethics" वर चर्चा करताना पुन्हा एकदा हाच प्रश्न प्राध्यापकांनीच उपस्थित केला.

     मला ऑफिसला जाण्या येण्या करता सरकारी गाडी allowed आहे. आता खालील पैकी काय एथिकल आहे व काय नाही?

१: माझ्या मुलाची शाळा ऑफिसच्या रस्त्याला लागूनच आहे. तर मी त्याला माझ्या गाडीतून घेऊन जातो व वाटेत शाळेत सोडतो.
२: माझ्या मुलाची शाळा ऑफिसच्या रस्त्यात फक्त शंभर मीटर आत आहे. तर मी त्याला माझ्या गाडीतून घेऊन जातो व किंचित आत जाउन शाळेत सोडतो.
३: माझ्या मुलाची शाळा ऑफिसच्या रस्त्याला लागूनच आहे. तर मी त्याला माझ्या गाडीतून घेऊन जातो व वाटेत शाळेत सोडतो. तसे करता यावे म्हणून मी शक्यतो सकाळी ऑफिसच्या बाहेर कुठली मीटिंग ठेवत नाही. आधी सरळ ऑफिस, मग कुठेही मीटिंग.
४ : माझ्या मुलाची शाळा ऑफिसच्या रस्त्याला लागूनच आहे, पण वेळ पंधरा मिनिटे (फक्त) उशिराची आहे. तर त्याला माझ्या गाडीतून शाळेत सोडता यावे म्हणून मी म्हणून मी पण पंधरा मिनिटे (फक्त) उशीराने निघतो. मला त्यात काहीच चूक वाटत नाही कारण मी एकटा वेळेवर पोहोचून काय होणार? इतर लोक पण पंधरा मिनिटे उशीरानेच येतात. आणी मी रोज दोन तास तरी उशीरा पर्यंत काम करतोच कि, आणी राजपत्रित अधिकरी असल्याने मला काही "ओवर टाइम" वगैरे पण नसतो, त्याचे काय?

     या वर अजून बरेच काही लिहिण्या सारखे आहे, व पुढचा टप्पा "भ्रश्टाचार म्हणजे काय रे भाऊ?" वर पोहोचतो. पण त्या आधी उपक्रमींची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल.

--चेतन पन्डित
(April 23, 2013)
-------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.12.2022-गुरुवार.