मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-41-लिनक्स विषयी थोडेसे-1-ब

Started by Atul Kaviraje, December 18, 2022, 09:36:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-41
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "लिनक्स विषयी थोडेसे"

                               लिनक्स विषयी थोडेसे-1--ब--
                              -------------------------

     संगणक म्हणजे आपल्या समोर दिसणारा पडदा, कीबोर्ड, माऊस आणि त्याचा मेंदू. या मेंदूला मायक्रो प्रोसेसर म्हणतात. संगणकाच्या विविध भागांशी आणि वापरणाऱ्याशी संपर्क निर्माण व्हावा यासाठी आणि विविध कामे करणाऱ्या प्रणाली वापरता याव्यात म्हणून एक मूलभूत संगणक प्रणाली संगणकाच्या स्मृतिकक्षात भरावी लागते. ती कार्यकारी प्रणाली होय. प्राण्याचे पिल्लू, अगदी लहान असतानाही पहाणे , ऐकणे, हालचाल करणे, आवाज काढणे अशा अनेक प्राथमिक क्रिया करू शकते. या करण्यासाठी या पिल्लाकडे जी प्रणाली असते. तशीच संगणकाची कार्यकारी प्रणाली असते. एकदा या क्रिया करता यायला लागल्या की मग इतर गोष्टी ते पिल्लू शिकू शकते. नंतर शिकण्याच्या गोष्टींची तुलना आपल्याला संगणकात वापरल्या जाणाऱ्या इतर उपयुक्त प्रणालींशी करता येते. या प्रणालींना इंग्रजीत अँप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटले जाते. यात कचेरीत वापरल्या जाणाऱ्या ऑफिस सूट, हिशेब प्रणाली, चित्रे काढण्याची प्रणाली या सारख्या प्रणालींचा अंतर्भाव करता येईल.

     संगणकाची एकूण परिणामकारकता त्यावरील कार्यकारी प्रणालीवर अवलंबून असते. जगभर प्रसिद्ध असलेली आणि अनेक ठिकाणी वापरली जाणारी विंडोज ही प्रणाली, अनेकांना ठाऊक असते. हल्लीच निरनिराळ्या कारणांमुळे लिनक्सचे नाव आपल्यापैकी अनेकांच्या कानावर आहे. साधारणपणे विंडोज वर ज्या ज्या गोष्टी करता येतात, त्या सर्व लिनक्स वर करता येतातच. पण अनेक बाबतीत लिनक्स जास्त सरस आहे. पूर्वी लिनक्स ही फक्त अभियंते आणि शास्त्रज्ञ यांनी वापरण्याची प्रणाली होती. माऊसचा कमी वापर आणि उपयोजित प्रणालींची कमी संख्या, आणि लोकप्रिय विंडोजच्या पेक्षा वेगळ्या आज्ञा या कारणांमुळे लिनक्स लोकाभिमुख झाली नाही. आता मात्र, गेल्या काही वर्षात जागतिक संगणकतज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या सर्व अडचणींवर मात करून लिनक्सने आपले प्रभावक्षेत्र प्रचंड वाढवले आहे.

     "लिनक्समधे असे काय आहे की ज्यामुळे आम्ही विंडोजचा वापर बंद करून लिनक्स वापरावे ?" हा अनेकांचा प्रश्न असू शकतो. त्यातल्या अनेकांना आपल्या संगणकाबरोबरच "आणतानाच बसवून मिळालेली " जागतिक दबदब्याची विंडोज प्रणाली वापरायला लायसेन्स लागते आणि त्यासाठी सुमारे ४-५ हजार रुपये जादा मोजावे लागतात याची कल्पनाच नसते. पण "तसे सगळेच तर करतात " या सबबीवर या कडे दुर्लक्ष केले जाते. "तसे असेल तर मग आता पर्यंत आमच्यावर काहीच कारवाई का झाली नाही ?" या त्यांच्या प्रश्नाचे अजिबात उत्तर न देता लिनक्स का वापरावे या प्रश्नाचे उत्तरआता आपण पहाणार आहोत.

     लिनक्स वापरावे कारण त्याची संगणकावर प्रतिस्थापना करणाऱ्या सी.डी. मधेच ही प्रणाली इतरांना कॉपी करून देण्याचे स्वातंत्र्य देणारे लायसेन्स अंतर्भूत असते.

(हा लेख उबंटू लिनक्स १०.०४ या लिनक्स प्रणालीचा आणि लिबर-ऑफिस या उपयुक्त प्रणालीचा वापर करून टंकलिखित केला आहे.)
-------------------------------------------------------------------------

--प्रसाद मेहेंदळे
(April 12, 2013)
------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.12.2022-रविवार.