२०-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 20, 2022, 09:02:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.१२.२०२२-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                  "२०-डिसेंबर-दिनविशेष"
                                 ----------------------

-: दिनविशेष :-
२० डिसेंबर
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०१०
भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा 'साहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर
१९९९
पोर्तुगालने 'मकाऊ' हे बेट चीनला परत दिले.
१९९४
राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा 'जवाहरलाल नेहरू पुरस्कार' प्रदान
१९७१
झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९६७
शांतता कोर्ट चालू आहे
नाटकाची पहिली टीम
'रंगायन' निर्मित, विजय तेंडुलकर लिखित आणि अरविंद देशपांडे दिग्दर्शित 'शांतता कोर्ट चालू आहे' या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील 'रवींद्र नाट्यमंदिर' येथे दुपारी साडे तीन वाजता झाला. या नाट्यप्रयोगात सतीश दुभाषी, सुलभा देशपांडे असे दिग्गज कलाकार होते. राज्य नाट्यस्पर्धेत जरी या नाटकाला पारितोषिक मिळाले नसले तरी पुढे या नाटकाला 'कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक' हे अत्यंत मानाचे पारितोषिक व अनेक पुरस्कार मिळाले. अनेक भाषांमध्ये 'शांतता कोर्ट चालू आहे' चे भाषान्तर आणि प्रयोग झाले. अनेक ठिकाणी हे नाटक अभ्यासक्रमात लावले गेले. रंगभूमीवरील काही महत्त्वाच्या नाटकांमध्ये 'शांतता! कोर्ट चालू आहे' या नाटकाचा समावेश होतो. मराठी रंगभूमीच्या प्रवासात 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक एक मैलाचा दगड ठरले आहे.
१९४५
मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
१९४२
दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.
१९२४
हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४२
राणा भगवानदास
राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले 'हिन्दू' मुख्य न्यायाधीश (Chief Justice)
(मृत्यू: २३ फेब्रुवारी २०१५)
१९४०
यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री (१९६७)
१९०१
रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: १६ जानेवारी १९६७)
१८९०
जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – झेक रसायनशास्त्रज्ञ, 'इलेक्ट्रो केमिकल अ‍ॅनॅलेसिस'मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक (१९५९) देण्यात आले.
(मृत्यू: २७ मार्च १९६७)
१८६८
हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक
(मृत्यू: ७ फेब्रुवारी १९३८)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१०
नलिनी जयवंत – अभिनेत्री
(जन्म: १८ फेब्रुवारी १९२६)
२०१०
सुभाष भेंडे – लेखक
(जन्म: १४ आक्टोबर १९३६)
१९९८
बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी
(जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
१९९६
कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला.
(जन्म: ९ नोव्हेंबर १९३४ - ब्रुकलिन, न्यूयॉर्क, यु. एस. ए.)
१९९६
दया पवार
दगडू मारुती तथा 'दया' पवार – 'बलुतं'कार दलित लेखक
(जन्म: १५ सप्टेंबर १९३५)
१९९३
वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार
(जन्म: ? ? ????)
१९५६
देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ 'संत गाडगे महाराज' – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
(जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)
१९३३
विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.
(जन्म: २२ मे १८७१)
१७३१
छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा
(जन्म: ४ मे १६४९)
=========================================

POSTED------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.12.2022-मंगळवार.