मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-71-माझा आवडता खेळ कबड्डी

Started by Atul Kaviraje, December 23, 2022, 10:13:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  "मला आवडलेला निबंध"
                                      निबंध क्रमांक-71
                                 ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता खेळ कबड्डी"

     मित्रानो आपल्या देशात वेगवेगळे खेळ खेळले जातात. पण आजच्या या निबंधाचा विषय आहे माझा आवडता खेळ कबड्डी निबंध (kabaddi Marathi Nibandh.). या निबंधाला तुम्ही आपल्या शाळेचा होमवर्क म्हणून वापरू शकतात. तर चला मग सुरू करू....

     खेळणे आरोग्यासाठी खूपच उपयोगाचे असते. खेळ कोणताही असो तो तंदुरुस्ती आणि ताजेपणा निर्माण करतो. ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी व्हावे असे वाटते त्यांनी मैदानी खेळ खेळायला हवे. एकी कडे क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, हॉलिबॉल इत्यादी विदेश खेळ आहेत, हे खेळ महागडे आहेत यात साहित्याची आवश्यकता असते. तर दुसरी कडे कोणताही खर्च न करता खेळता येणारे खेळ म्हणजे कब्बडी, खोखो, कुस्ती इत्यादी. मला इतर खेळाच्या तुलनेत कब्बडी अतिप्रिय आहे. कबड्डी माझा आवडता खेळ आहे.

     कबड्डी ला खेळण्यासाठी जास्त जागेची पण आवश्यकता नसते कमी जागेत देखील हा खेळ खेळता येतो. लहान मैदानात मधोमध एक रेखा मारली जाते. खेळाडूंना दोन संघात वाटले जाते. प्रत्येक संघामध्ये 8 खेळाडू असतात. दोघी संघ रेषेच्या दोघी बाजूंना उभे राहतात. आधी कोणत्याही एका संघाचा खेळाडू दुसऱ्या बाजूला जातो, विरुद्ध पक्षाच्या खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. जर दुसऱ्या संघातील खेळाडूंनी त्याला पकडून घेतले तर तो आऊट धरला जातो, पण जर तो कोणत्याही एक किंवा एकापेक्षा जास्त खेळाडूंना हात लावून रेषेच्या अलीकडे येऊन गेला तर त्यांच्याद्वारे स्पर्श झालेले सर्व खेळाडू बाद होतात.

     मला कबड्डी खेळ अवडण्यामागे खूप सारी कारणे आहेत. या खेळाला खेळण्यासाठी जास्त जागेची गरज पडत नाही. घराच्या मोकळ्या जागेत देखील आपण याला खेळू शकतो. याला खेळण्यासाठी काहीही साहित्य खर्च लागत नाही. आरोग्यासाठी हा खेळ खूपच चांगला आहे. यात खेळाडूंना निरंतर पळत राहावे लागते ज्या मुळे शरीराचा चांगला व्यायाम होऊन जातो. माझी इच्छा आहे की कबड्डी ला शाळा व कॉलेजमध्ये अनिवार्य करायला हवे. विदेशी खेळ खेळण्या ऐवजी भारतीय खेळाणां महत्त्व द्यायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.12.2022-शुक्रवार.