२४-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 24, 2022, 08:57:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२४.१२.२०२२-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                 "२४-डिसेंबर-दिनविशेष"
                                ----------------------

-: दिनविशेष :-
२४ डिसेंबर
राष्ट्रीय ग्राहक दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९९
फ्लाईट-८१४
कंदाहार विमानतळावर अपहरण केलेले विमान
काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या 'इंडियन एअरलाइन्स फ्लाईट-८१४' या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.
१९७९
सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.
१९६७
'कट्यार काळजात घुसली' या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९५१
लिबीयाचा ध्वज
लिबीया हा देश (ईटलीकडून) स्वतंत्र झाला.
१९४३
ड्वाईट आयसेनहॉवर
दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती बनला.
१९२४
अल्बानियाचा ध्वज
अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९१०
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा
१९०६
रेजिनाल्ड फेसेंडेन या कॅनेडियन-अमेरिकन संशोधकाने जगातील पहिले रेडिओ प्रक्षेपण केले. त्यात एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचा समावेश होता.
१७७७
कॅप्टन जेम्स कूकने प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५९
अनिल कपूर
२०१८ मधील छायाचित्र
अनिल कपूर – हिन्दी चित्रपट कलाकार
१९५७
हमीद करझाई
२०१२ मधील छायाचित्र
हमीद करझाई – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
१९२४
मोहम्मद रफी
मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री (१९६७)
(मृत्यू: ३१ जुलै १९८० - मुंबई)
१८९९
साने गुरूजी
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ 'साने गुरूजी' – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे 'श्यामची आई' हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे.
(मृत्यू: ११ जून १९५०)
१८८०
पट्टाभी सीतारामय्या
१९९७ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला 'हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस' हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
(मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)
१८६४
विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून 'उत्कल साहित्य' नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले.
(मृत्यू: १९ आक्टोबर १९३४)
१८१८
जेम्स प्रेस्कॉट ज्यूल
जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक
(मृत्यू: ११ आक्टोबर १८८९)
११६६
जॉन – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: १९ आक्टोबर १२१६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००५
भानुमती रामकृष्ण
भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका, पद्मश्री (१९६६), पद्मभूषण (२००१)
(जन्म: ७ सप्टेंबर १९२५)
१९८७
एम. जी. रामचंद्रन
मरुथर गोपाल तथा एम. जी. रामचंद्रन – अभिनेते, ए. आय. ए. डी. एम. के. या राजकीय पक्षाचे संस्थापक व तामिळनाडूचे तिसरे मुख्यमंत्री, भारतरत्न (१९८८)
(जन्म: १७ जानेवारी १९१७)
१९७७
नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका
(जन्म: २३ मार्च १८९८)
१९७३
पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते
(जन्म: १७ सप्टेंबर १८७९)
१५२४
वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला.
(जन्म: ?? १४६९)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.12.2022-शनिवार.