२६-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 26, 2022, 09:19:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.१२.२०२२-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "२६-डिसेंबर-दिनविशेष"
                                  ----------------------

-: दिनविशेष :-
२६ डिसेंबर
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००४
९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली. या लाटेने भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.
१९९७
विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार
१९८२
टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा 'मॅन ऑफ द इयर' पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
१९७६
कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
१८९८
मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४८
डॉ. प्रकाश आमटे
१९४१
लालन सारंग – चित्रपट, रंगभूमी तसेच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री व निर्माती
(मृत्यू: ९ नोव्हेंबर २०१८)
१९३५
डॉ. मेबल आरोळे – बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या
(मृत्यू: २७ डिसेंबर १९९९)
१९२५
पं. कृष्णा गुंडोपंत तथा 'के. जी.' गिंडे – शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक
(मृत्यू: १३ जुलै १९९४)
१९१७
डॉ. प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये स्वप्‍नभंग, अनुक्षण, मेपल हे काव्यसंग्रह; एक तारा, दर्दके पाबंद इ. कादंबर्‍या; नाट्यचर्चा, समीक्षा की समीक्षा आदींचा समावेश आहे.
(मृत्यू: १७ जून १९९१)
१९१४
डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक
मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८)
१९१४
डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता 'महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस' या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे.
(मृत्यू: ३ जानेवारी २०००)
१८९३
माओ त्से तुंग
माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते
(मृत्यू: ९ सप्टेंबर १९७६)
१७९१
चार्ल्स बॅबेज
चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक
(मृत्यू: १८ आक्टोबर १८७१)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००६
कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते
(जन्म: १५ सप्टेंबर १९२१)
२०००
प्रा. शंकर गोविंद साठे – कवी, कथालेखक आणि नाटककार. त्यांच्या 'ससा आणि कासव' या नाटकावरून सई परांजपे यांनी 'कथा' या नावाचा चित्रपट काढला होता.
(जन्म: ११ मार्च १९१२)
१९९९
शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती
(जन्म: १९ ऑगस्ट १९१८)
१९८९
केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), 'चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट' आणि 'शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम' यांचे संस्थापक
(जन्म: ३१ जुलै १९०२ – कायमकुलम, केरळ)
१९७२
हॅरी ट्रूमन
Official Portrait : 1947
हॅरी एस. ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ८ मे १८८४)
१५३०
बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक
(जन्म: १४ फेब्रुवारी १४८३)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.12.2022-सोमवार.