मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-49-ओज-शंकराची कहाणी-

Started by Atul Kaviraje, December 26, 2022, 09:41:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-49
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ओज-शंकराची कहाणी"

                                   ओज-शंकराची कहाणी--
                                  --------------------

     पूर्वांचलातील कामांत त्यांनी संघसंपर्कांचा मुळीच उपयोग केला नाही. कुठेही ते दीर्घकाळ राहिले नाहीत. त्यांना कायमस्वरूपी असे घरच नव्हते. गोळवलकर गुरूजींनी एकदा त्यांना विचारले, "भैय्या, तू सारखा फिरत असतोस, स्थिर का होत नाहीस?" तेव्हा भैय्याजी म्हणाले होते, "मी अनिकेत आहे, पण स्थिरमति!" ह्याला गीतेच्या बाराव्या अध्यायातील एकोणिसाव्या श्लोकाची पार्श्वभूमी आहे. तो श्लोक असा आहेः

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येनकेनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः ॥ - भगवद्गीता-१९-१२
म्हणजेच
निंदा स्तुति न घे मौनी मिळे ते गोड मानितो ।
स्थिर बुद्धि निराधार भक्त तो आवडे मज ॥ - गीताई-१९-१२

"अनिकेतः स्थिरमतिः" हे भैयाजींनी केलेले स्वतःचे वर्णनच त्यांचे सर्वात यथार्थ वर्णन आहे. त्यामुळे अर्थातच ते भगवंतांचे प्रिय व्यक्ती असायलाच हवेत.

     १९७३ च्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या मातोश्री निवर्तल्याची तार आल्याने त्यांना नाईलाजानेच परतावे लागले. परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी, लालमोहन शर्मा ह्या मैतेयी आणि शंकन ह्या तांगखूल नागा मुलासही जाणीवपूर्वक सोबत घेतले. जयवंतही सोबत होताच. सांगलीत आईचे दिवस पूर्ण होताच त्यांनी स्वतः शिक्षकी पेशा पत्करला आणि मुलांना सोबत घेऊन राहू लागले. पुढे ह्या मुलांना घेऊन ते जेव्हा न्यू तुसॉमला परत गेले तेव्हा त्यांची प्रगती झालेली पाहून इतर पालकही आमच्या मुलांना घेऊन जा. शिकवा. असे मागे लागले. जास्त विद्यार्थ्यांची सोय करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या झेपणारे नव्हते. पण असल्या बारक्या समस्यांना दाद देतील तर ते भैय्याजी कसले! त्यांनी सांगलीतील प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थांनाही ह्या चांगल्या कामास हातभार लावण्यास विनंती केली. समाजानेही त्यांचा शब्द वाया जाऊ दिला नाही. मग १९९२ पर्यंत त्यांनी शेकडो विद्यार्थी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रात आणले, शिकवून मोठे केले आणि त्यांना प्रेरित करून पुन्हा पूर्वांचलात पाठवले. आज ते विद्यार्थीच जबाबदार नागरिक झालेले आहेत. त्यांचे उद्दिष्टास पुढे नेत आहेत.

     १९९२ नंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम पत्करला. एकाकी जीवन जगणे पसंत केले. कुठेही दीर्घकाळ राहिले नाहीत. कुणासही भारभूत झाले नाहीत. ते त्यांच्या स्वभावातच नव्हते. २६ ऑक्टोंबर १९९९ रोजी, बंधूंचे घरीच कोल्हापूरात, मेंदूतील कर्क अर्बुदा (ब्रेन ट्युमर) मुळे त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता कळली तेव्हा जागोजाग त्यांच्या विद्यार्थांना पोरके वाटू लागले. २६ ऑक्टोंबर २००० रोजी न्यू तुसॉम येथे झालेल्या श्रद्धांजली सभेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि गावकर्‍यांनी त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीचे शब्द मुळातच वाचण्यासारखे आहेत [१].

     २००२ साली त्यांच्या एका मित्राने, श्री.अ.गो.कुंटे ह्यांनी त्यांचे एक चरित्र प्रकाशित केले. त्या पुस्तकात त्यांच्या कामाचे थोडक्यात वर्णन उपलब्ध आहे [२]. मात्र, भैय्याजींसारख्या प्रसिद्धीपराङगमुख व्यक्तीचा माग काढणे मुळीच सोपे नाही. तरीही त्यांच्या लाखो चाहत्यांच्या मनांत त्यांच्या आठवणी सदैव ताज्या आहेत. त्यांचे विद्यार्थी आणि पुढे दहाहून अधिक वर्षे पूर्वांचलात राहून त्यांच्या कामास पूर्णत्व देणारे श्री. जयवंत कोंडविलकर यांच्या आठवणींवर आधारित "उख्रुलचे आव्हान" [३] हे पुस्तकही मुळातच वाचनीय आहे. एवढेच सांगून ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करतो.

--नरेंद्र गोळे
(April 3, 2013)
-----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.12.2022-सोमवार.