मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-75-माझा आवडता ऋतू पावसाळा

Started by Atul Kaviraje, December 27, 2022, 09:13:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-75
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता ऋतू पावसाळा"

     मित्रांनो, आपल्या देशात वर्षभरात तीन प्रमुख ऋतु येतात यात पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा यांचा समावेश आहे. प्रत्येक ऋतूचे आपापले महत्व आहे. परंतु majha avadta rutu पावसाळा आहे.

म्हणूनच आजच्या या लेखात मी तुम्हाला माझा आवडता ऋतु पावसाळा या विषयावर मराठी निबंध देणार आहे. तर चला निबंधIला सुरू करूया..

     आपल्या देशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. परंतु या तिन्ही ऋतू मधून मला पावसाळा हा ऋतू अतिप्रिय आहे. उन्हाळ्यात भयंकर उष्णता आणि गर्मी होते. पावसाळा आपली या उष्णतेपासून सुटका करतो आणि सुखद गारवा देतो. दक्षिणेकडून येणारे थंड वारे आपल्यासोबत पाऊस घेऊन येतात. या वाऱ्यांना मान्सून वारे म्हटले जाते. भारतात पावसाळा pavsala जुलै महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत राहतो. यादरम्यान काही भागात जोरदार अतिवृष्टी होते तर काही भागात खूप कमी प्रमाणात पाऊस येतो.

     पावसामुळे जमीन थंड आणि हिरवी बनते. हा बदल मला खूप आवडतो. यादरम्यान शेतकरी नांगरणी व पेरणीच्या कामात व्यस्त होतात आणि काही दिवसातच निसर्गाचे रूप सुखद होऊन जाते. गाईगुरे जमिनीवर चरायला लागतात. थंडगार वारे वाहायला लागतात आणि पावसाचे संगीत कानांना शांती प्रदान करते. गडद काळे आणि जाड ढग आकाशात फिरायला लागतात. ढगांचे हे दृश्य पाहून व आवाज ऐकून मोर आनंदाने नाचायला लागतो. अश्या या सुंदर ऋतूचे आम्ही आनंदाने स्वागत करतो.

     पण बऱ्याचदा पावसामुळे नुकसान सुद्धा होतात. रस्ते चिखलाने भरून जातात. कित्येकदा नदी नाल्यांना पुरही येतो. वाहतुकीत येणाऱ्या अडचणीमुळे व्यापारही मंद होतो. गरिबांची घरे गळायला लागतात आणि बऱ्याचदा तर अतिवृष्टी मुळे कोसळून पण येतात. अश्यात बरेच गरीब व भिकार्‍यांना निवारा राहत नाही. खूप सारे किडे मुंग्या, नाकतोडे, साप आणि गांडूळ या ऋतूत जन्म घेतात. पण काहीही असो हे सत्य आहे की पावसाळा आपल्या देशातील सर्व ऋतून पेक्षा चांगला आहे. या पावसाला pavsala पाहून मनात अनेक कविता येतात, त्यातीलच एक कविता.

     विशेष करून शेतकरी पावसाळ्याचे स्वागत करतात. कारण त्याची पिके पावसावरच अवलंबून असतात. जर एखाद्या वर्षी पावसाळा चुकला तर त्यांची पिके उद्ध्वस्त होतात. पावसाळा (pavsala) आपल्यासाठी अन्न आणि भाजीपाला उपलब्ध करून देतो. जंगले टवटवीत आणि हिरवी होतात. नदी आणि धबधबे जे उन्हाळ्यात कोरडे झालेले असतात ते पावसामुळे पुन्हा एकदा वाहू लागतात.

टिप टिप पाऊस झो झो वारा,
गीत गाऊ पाहतो आसमंत सारा

कडाडणारी वीज गडगडणारे ढग
धावण्यार्‍या छत्रीतली आपली लगबग

डराव्‌ डराव्‌ बेडकं छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू थेंब लाटेवर पळे

खळ खळ झरा तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा ताला सुरांची जत्रा

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.12.2022-मंगळवार.